नवज्योतसिंग सिद्धू sakal
देश

नवज्योतसिंग सिद्धूंचे नवीन मुख्यमंत्री चन्नींशी ही जमेना

नवज्योतसिंग सिद्धूशी वाद विकोपाला गेल्यानंतर कॅप्टन अमरींदर सिंग यांनी काँग्रेस सोडली. मात्र अद्यापही पंजाब काँग्रेसमधील वाद काही अद्याप संपलेला दिसत नाही.

सकाळ डिजिटल टीम

चंदीगड : नवज्योतसिंग सिद्धूशी वाद विकोपाला गेल्यानंतर कॅप्टन अमरींदर सिंग यांनी काँग्रेस सोडली. मात्र अद्यापही पंजाब काँग्रेसमधील वाद काही अद्याप संपलेला दिसत नाही. आता मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी (CM Charanjit Singh Channi) आणि सिद्धूमध्ये तणाव निर्माण झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सिद्धू यांनी १३ सूत्रीय एजेंडा असलेली चिठ्ठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना पाठवली आहे. त्या चिठ्ठीवरुन रविवारी झालेल्या बैठकीत सिद्धू आणि चन्नी यांच्यात वाद झाला.चंदीगड येथील गव्हर्नर हाऊसमध्ये झालेल्या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार वाद झाला. यावेळी पंजाब काँग्रेसचे पर्यवेक्षक हरिश चौधरी आणि प्रदेश काँग्रेस समितीचे (Navjot Singh Sidhu) महासचिव प्रकटसिंग हे ही उपस्थित होते. बैठकीदरम्यान सिद्धू यांनी १३ सूत्रीय एजेंडा पुढे केल्याने मुख्यमंत्री चन्नी नाराज झाले. या नाराजीमुळे त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊ केला.

चन्नी यांनी सिद्धू यांना आवाहन दिले की त्यांनी दोन महिन्यांसाठी मुख्यमंत्री व्हावे आणि १३ सूत्रीय एजेंड्याची अंमलबजावणी करुन दाखवावी. सूत्रांच्या दाव्यानुसार सिद्धू यांनी मुख्यमंत्री चन्नी यांच्यावर बादल कुटुंबाच्या व्यवसायावर कारवाई करण्याचा दबाव आणत आहेत. याबाबत उल्लेख त्यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या चिठ्ठीत केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: पेपर लीकविरोधात 'कॉकरोच जनता पार्टी'चा एल्गार! आंदोलनासाठी परवानगी कशी मिळते? जाणून घ्या प्रक्रिया

Diesel Selling : कॅनमध्ये डिझेल विक्रीला बंदी; व्यावसायिकांसह वाहनचालकांची गैरसोय

Bhor News : माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे निधन

Hero HF Deluxe : पेट्रोलची चिंता संपणार? नितीन गडकरींची मोठी भेट; भारतात पहिल्या Flex Fuel बाईकची एन्ट्री, किंमत 72 हजारपासून सुरू

Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघात! एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT