praful patel Sakal
देश

NCP Crisis : राष्ट्रवादी पक्षातही 'एनडीए' विरूद्ध 'इंडिया'; प्रफुल्ल पटेल म्हणाले, आम्ही…

रोहित कणसे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार यांच्या बंडानंतर पक्षात उभी फूट फडली. यानंतर आता राष्ट्रवादी पक्ष विरोधकांच्या इंडिया या आघाडी सोबत राहणार की एनडीए सोबत जाणार? या प्रश्नाचं उत्तर प्रफुल्ल पटेल यांनी दिलं आहे. मागच्या महिन्यात पाटणा येथे झालेल्या विरोधीपक्षांच्या बैठकीत पटेल सहभागी झाले होते. यानंतर मंगळवारी दिल्लीत झालेल्या एनडीएच्या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत ते सहभागी झाले.

दरम्यान एनडीएच्या बैठकीनंतर लगेच प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एनडीएचा अविभाज्य भाग असून त्यांचा पक्ष भविष्यात एनडीएसोबत काम करेल असे स्पष्ट केलं.

प्रफुल्ल पटेल म्हणाले की, मी आणि अजित पवार आज(मंगळवार) एनडीएच्या बाठकीत इतर राजकीय पक्षांसोबत उपस्थित होतो. एनसीपी, एनडीएचा अविभाज्य भाग आहे, भविष्यात एनसीपी, एनडीएसोबत राहून काम करेल.

पटेले पुढे बोलताना म्हणाले की, एनडीएला २५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमीत्ताने ३८ राजकीय पक्ष उपस्थित होते. आमच्याकडून मी आणि अजित पवार यांनी बैठकीत आपलं म्हणणं मांडलं. दरम्यान सोमवारी शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीत बंड केलेल्या प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतली.

यावेळी पटेलांनी पक्ष एकसंध राहण्यासाठी विचार करावा अशी विनंती शरद पवार यांच्याकडे केली होती, यावर शरद पवारांनी मात्र कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती. प्रफुल्ल पटेल यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यासह मुंबईतील वाय.बी. चव्हाण सेंटर येथे शरद पवार यांची भेट घेतली होती.

शरद पवार विरोधकांच्या बैठकीला

अजित पवार यांनी २ जुलै रोजी अचानक उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली , त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे इतर आठ आमदार देखील एनडीए सरकारमध्ये सहभागी झाले होते. यानंतर राष्ट्रवादी पक्षात दोन गट पडले आहेत. यातील अजित पवारांचा गट एनडीएच्या बैठकीत उपस्थित होता. तर दुसरीकडे शरद पवार हे बेंगळुरू येथे झालेल्या विरोधकांच्या बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे राष्ट्रावादी पक्षातही 'एनडीए' विरूद्ध 'इंडिया' सामना रंगणार आहे. यादरम्यान राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मात्र कोणत्या बाजूला आसणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case: खरात प्रकरणात मोठी अपडेट! ईडीकडून ११ ठिकाणी छापे; आजच्या सुनावणीत काय घडलं?

Gas Cylinder Shortage : मोठा काळाबाजार! चाकणला कमर्शियल वापराचा गॅस सहा हजार रुपयाला

पुलाचा एक मार्ग सुरू करण्याची घाई ११ जणांच्या जीवावर, प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे बळी; मुरबाडवर शोककळा

Jalgaon Temperature : जळगावसह जिल्ह्याचा पारा पोहोचला ४१ अंशांवर; रस्‍त्‍यांवर दुपारी शुकशुकाट

Legendary Singer Asha Bhosale : आशाताईंनी अर्धवट सोडला होता 'शो', भावासाठी ओढवून घेतलं होतं 'धर्मसंकट'; IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटलांनी जागवल्या आठवणी!

SCROLL FOR NEXT