Ajit Pawar tweeted after supreme court verdict.jpg 
देश

NCP Supreme Court: राष्ट्रवादी पक्ष अन् घड्याळाचं काय होणार? अजित पवारांकडून सुप्रीम कोर्टानं मागितलं उत्तर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि या पक्षाचं चिन्ह घड्याळ याबाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि या पक्षाचं चिन्ह घड्याळ याबाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. याप्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. यामध्ये अजित पवारांना दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत. त्यामुळं आता नेमकं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा विषय पुन्हा एकदा चर्चेत येणार आहे.

शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांनी पक्षाचा वेगळा संसार थाटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह घड्याळ हे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अजित पवारांना बहाल केलं. पण याविरोधात शरद पवार गटानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. या प्रकरणावर आज सुनावणी पार पडली. यावेळी सुप्रीम कोर्टानं दोन आठवड्यात लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश दिले. त्यामुळं आता या प्रकरमावर हे उत्तर दाखल झाल्यानंतर ६ ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

दरम्यान, अजित पवारांच्या उत्तरावर जर शरद पवारांना प्रतिपक्ष करायचं असेल तर एका आठवड्यात शरद पवारांनी तसा अर्ज दाखल करावा, असे निर्देशही यावेळी कोर्टानं दिले.

दरम्यान, सध्या राष्ट्रवादी काँग्रेस हा मूळ पक्ष आणि चिन्ह घड्याळ अजित पवारांच्या ताब्यात आहे. तर शरद पवार यांना निवडणूक आयोगानं नव्या पक्षासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे नाव दिलं असून तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिलं आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत याच दोन वेगळ्या चिन्हांवर अजित पवार आणि शरद पवार यांचे पक्ष स्वतंत्ररित्या लढले होते. यामध्ये शरद पवारांच्या पक्षानं १० पैकी ८ जागा जिंकल्या. तर अजित पवारांना केवळ एकच जागा मिळाली. त्यामुळं लोकसभेला अजित पवारांना मोठी हार पत्करावी लागली होती.

पण आता निवडणूक आयोगानं नुकतेच शरद पवारांच्या पक्षाला आणि चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस याला अधिकृत मान्यता दिली होती. त्यामुळं त्यांच्या पक्षाला अधिकृतरित्या निधी देखील गोळा करता येणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत आता शरद पवारांना हाच पक्ष आणि चिन्ह घेऊन लढावं लागू शकतं. पण तरीही मूळ राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह घड्याळ याबाबत सुप्रीम कोर्टात लढाई सुरुच आहे. येत्या काळात याबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा निर्णय येऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT