Venkaiah_Naidu 
देश

भाजपकडून उपराष्ट्रपती पदासाठी व्यंकय्या नायडूंना उमेदवारी

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीचे सूप वाजत असतानाच भारतीय जनता पक्षाकडून (भाजप) आज (सोमवार) उपराष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीसाठी ज्येष्ठ पक्षनेते व्यंकय्या नायडू यांचे नाव घोषित करण्यात आले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील (एनडीए) सर्व पक्षांचा नायडू यांच्या उमेदवारीस पाठिंबा असल्याचे सांगत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी नायडूंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले.

नायडू हे सध्याच्या केंद्र सरकारमध्ये नगरविकास व माहिती प्रसारण मंत्रालयांची जबाबदारी सांभाळत आहेत. एनडीएचे राष्ट्रपतीपदासाठीचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्या विविध राज्यांमधील दौऱ्यांवेळी नायडू यांनी त्यांना सहाय्य केले होते.

दाक्षिणात्य राज्यांमध्ये आपला प्रभाव वाढविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भाजपकडून उपराष्ट्रपतीपदासाठी दक्षिण भारतामधील उमेदवार निवडण्यात येईल, अशी अटकळ याआधी बांधण्यात आली होती. या पार्श्‍वभूमीवर, नायडूंच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

उपराष्ट्रपतीपदाची ही निवडणूक आता येत्या 5 ऑगस्ट रोजी होणार असून यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 18 जुलै आहे. देशातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेस पक्षाकडून याआधीच उपराष्ट्रपतीपदासाठी ज्येष्ठ विचारवंत गोपालकृष्ण गांधी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. देशाचे सध्याचे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचा कार्यकाळ येत्या 10 ऑगस्ट रोजी संपणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: अन्यथा असे आणखी अशोक खरात उदयास येतील; उत्तर महाराष्ट्रात अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त, संपत्ती लुटली, तरी सरकार निष्क्रिय!

Latest Marathi News Live Update : गंगापूर तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीने रब्बी पिकांचे मोठे नुकसान

Ashok Kharat Case : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर फरार ? रुपाली पाटील यांच्या पोस्टने खळबळ

Gold rate Today: नवीन वर्षाच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याच्या भावात मोठा बदल! महाराष्ट्रात आज १ तोळ्याचा भाव किती?

Maternal Health : जिल्ह्यात ५ वर्षांत ३३ मातांचा मृत्यू; जिल्हा आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT