paper leakage sakal
देश

NEET-PG : आणखी एक परीक्षा पुढे ढकलली; नीट-पीजी परीक्षेबाबत आरोग्य विभागाची माहिती

संतोष कानडे

NEET-PG 2024 entrance examination : उद्या होणारी नीट-पीजी प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे. या परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर होईल. आरोग्य विभागाने याबाबत माहिती दिली.

मागच्या काही दिवसांपासून नीट परीक्षांमध्ये अनियमितता आणि गैरव्यवहार झाल्याचं निदर्शनास आलेलं आहे. शिवाय युजीसी नेट परीक्षेसंदर्भातही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. आता रविवारी होणारी NEET-PG प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

या परीक्षेची नवीन तारीख लवकरात लवकर जाहीर केली जाईल, असं आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. स्पर्धा परीक्षांवरुन झालेल्या आरोपांच्या घटना लक्षात घेऊन, आरोग्य मंत्रालयाने राष्ट्रीय परीक्षा मंडळाद्वारे आयोजित वैद्यकीय परीक्षा NEET-PG प्रवेश परीक्षेच्या प्रक्रियेचं सखोल मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला आहे. ही परीक्षा पुढे ढकलण्यात आलीय.

दरम्यान, शुक्रवारी राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सी अर्थात एनटीएने संयुक्त सीएसआयआर-यूजीसी-नेट परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली होती. ही परीक्षा २५ जून ते २७ जून दरम्यान होणार होती. लॉजिस्टिक कारणांमुळे परीक्षा स्थगित करण्यात आल्याचं NTA कडून सांगण्यात आलं. नवीन तारीख लवकच वेबसाईटवर घोषित केली जाणार आहे.

तसेच १९ जून रोजी केंद्र सरकारने परीक्षेवर प्रश्न उपस्थित करत १८ जून रोजी झालेली यूजीसी-नेट परीक्षा रद्द केली होती. बिहारसारख्या राज्यांमध्ये प्रश्नपत्रिका लीक होणं आणि नीट परीक्षेमधील गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे नेट परीक्षा रद्द करण्यात आलेली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

श्रीकृष्णाप्रमाणे कोणत्याही मुलाला तुरुंगात जन्माचे दुःख सहन करावे लागू नये; निदा खानला जामीन मंजूर करताना न्यायालयाने काय म्हटले?

मोठी बातमी! गौतम गंभीरच्या निरोपाची वेळ जवळ आली... BCCI ने सुरू केलीय तयारी; कामगिरीवर नाराजी, नेमकं काय घडतंय?

Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University : विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी! मराठवाडा विद्यापीठात 'या' 55 जागांवर मिळणार थेट प्रवेश; कुलगुरूंचा मोठा निर्णय

Hingoli Earthquake: जमीन अन् माणसेही हादरली! मध्यरात्री भूकंपाच्या धक्क्यांनी कळमनुरीकर भयभीत; खुल्या जागेत आश्रय घेत रात्र काढली जागून..

महाराष्ट्रातून थेट पाकिस्तानातील गुन्हेगारांशी संपर्क? ATS कडून मुंबई ठाण्यासह १५० हून अधिक ठिकाणी छापेमारी, नेमकं काय घडतंय?

SCROLL FOR NEXT