NEET-UG Supreme Court Hearing ask IIT delhi opinion on question no 19 answer  
देश

NEET Exam : 44 जणांना मिळालेल्या बोनस गुणांचा फटका 4 लाख विद्यार्थ्यांना; सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत धक्कादायक माहिती समोर

NEET-UG Supreme Court Hearing : तसेच सुप्रिम कोर्टाने IIT दिल्लीच्या संचालकांना 3 तज्ञांची टीम तयार करून या विषयावर अहवाल सादर करण्याच्या सूचना देखील केल्या आहेत.

रोहित कणसे

नवी दिल्ली : अनियमितता तसेच प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा (नीट) प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आहे. या प्रकरणात दाखल झालेल्या चाळीसपेक्षा जास्त याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सध्या सुनावणी सुरू आहे.

सुप्रीम कोर्टात सुरू असलेली आजची सुनावणी संपली, यावेळी नीट परीक्षेत एका प्रश्नाला दोन्ही पर्याय योग्य असल्याने 44 विद्यार्थ्यांना बोनस गुण मिळाले होते. मात्र त्यामुळं 4.2 लाख उमेदवारांचे नुकसान झाले असल्याचे समोर आले आहे. यानंतर कोर्टाने यावर आयआयटी दिल्लीच्या तज्ज्ञांचे मत घेतले पाहिजे असे मत नोंदवले आहे.

तसेच सुप्रिम कोर्टाने IIT दिल्लीच्या संचालकांना 3 तज्ञांची टीम तयार करून या विषयावर अहवाल सादर करण्याच्या सूचना देखील केल्या आहेत. त्यामुळे उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत कोर्टाने नेमकं बरोबर उत्तरं कोणतं आहे, हे एक्सपर्ट टीमला ठरवायला सांगितले आहे. NEET UG परीक्षेत 19 व्या प्रश्नाला प्रश्नपत्रिकेत दोन्ही उत्तर बरोबर दिली होती. एक्स्पर्ट टीमच्या उत्तरानंतर उद्या पुन्हा सुनावणी होईल. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर ही सुनावणी होईल. त्यानंतर याप्रकरणी कोर्ट काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काही दिवसांपू्र्वी झालेल्या सुनावणीवेळी कोर्टाने शहर आणि परीक्षा केंद्रनिहाय निकाल जाहीर करण्याचे आदेश नॅशनल टेस्टिंग एजन्सीला (एनटीए) दिले होते. त्यानुसार एनटीएने शनिवारी शहर आणि केंद्रनिहाय निकाल जाहीर केला होता.

समुपदेशन तोंडावर आले असल्याने याचिकांवर न्यायालय अंतिम निकाल देणार काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नीट-यूजी परीक्षा पुन्हा घेण्यात यावी असे वाटत असेल तर व्यापक प्रमाणात प्रश्नपत्रिका फुटल्याचे सिद्ध करा, अशी सूचना सरन्यायाधीशांनी मागच्या सुनावणीवेळी याचिकाकर्त्यांना केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सची विजयी मालिका खंडित! सनरायझर्स हैदराबादचा शानदार विजय; IPL 2026 Points Table बदललं

IPL 2026: आश्चर्यच... ना विराट, ना शुभमन Orange Cap तिसऱ्याच कुणाकडे; Purple Capवर चेन्नईच्या गोलंदाजाने निर्विवाद वर्चस्व

'काँग्रेस, काँग्रेस आणि फक्त काँग्रेस...;' मोदींचा केंद्रबिंदू त्याच नावाभोवती फिरला, संपूर्ण भाषणात किती वेळा उल्लेख केला?

SRH vs CSK Live: ४,४,४,४,४,६! आयुष म्हात्रेचं वादळ हेनरिच क्लासनने रोखलं; अविश्वसनीय झेल घेत हैदराबादचं मैदान गाजवलं Video Viral

होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! समुद्री व्यापारासाठी ‘सुरक्षाकवच देणार; जहाजांसाठी मोठी खुशखबर

SCROLL FOR NEXT