Prime Minister Narendra Modi Team eSakal
देश

'माफ करा मोदीजी तुमची सात वर्ष सेवा पाहिली'

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, मी आजही सत्तेत नाही आणि भविष्यातही सत्तेत राहु इच्छित नाही. मला फक्त सेवेत राहायचे आहे.

गणेश पिटेकर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या विधानावर लोक तुटून पडले आहेत. त्यांनी आपापल्या प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. आज रविवारी (ता.२८) 'मन की बात' या कार्यक्रमात मोदी म्हणाले, की मी आजही सत्तेत नाही आणि भविष्यातही सत्तेत राहु इच्छित नाही. मला फक्त सेवेत राहायचे आहे. माझ्यासाठी पंतप्रधानपद सत्तेसाठी नाही, तर सेवेसाठी आहे. ते आयुष्मान भारत योजनेच्या लाभार्थ्याशी बोलत होते. मोदींच्या या वक्तव्यावर बाबू गणपत म्हणतात, की माफ करा मोदीजी तुमची सात वर्ष सेवा पाहिली आहे. तसे या सात वर्षांमध्ये तुम्ही अदानी, अंबानींची खूप सेवा केली आहे. तसेच मेवाही खूप कमावले असतील.

या मेव्यातून एखादी बिगर शासकीय संस्था (एनजीओ) सुरु करा आणि आता जनतेची सेवा करा. त्यामुळे त्यांच्याबरोबर केलेल्या विश्वासघाताचे पाप धूऊन जाईल.

स्क्रीनशाॅट काढून ठेवा, असा उपरोधक टोला शुभम कुमार शुक्ला यांनी लगावला आहे. डोळ्यात पाणी आले, एकच हृदय आहे मोदीजी, असे रवि म्हणाले. अजय गुर्जर यांनी तर पंतप्रधान मोदींना राजीनामा द्यायचा सल्ला दिला आहे. पीएम साहेब तर हिमालयातून वापस का आले तिथे ठिक होते, असे विल्यम जाॅन म्हटले आहे. दिलेर सिंग राजपूत म्हणतात, की भावा मग झोळी घ्या आणि निघा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट! प्रत्येक लेव्हलचा फिटमेंट फॅक्टर असेल वेगळा; उद्या आयोगाची बैठक

PAK vs ENG, T20 WC: पाकिस्तानचा दुसरा सामनाही रद्द झाला तर? मुंबईतील उपांत्य फेरीचा सामना दुसरीकडे नाही खेळवावा लागणार; जाणून घ्या गणित

Dombivli Crime: नर्सने बोलणे बंद केले, रागात डॉक्टरने १० बिअर पिऊन ४५ झोपेच्या गोळ्या खाल्ल्या; त्यानंतर जे घडलं...

"माझं माझ्या बायकोवर प्रेम नाही" प्रसिद्ध अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा ; "जबरदस्तीने लग्न.."

Latest Marathi News Live Update : बार्शी तालुक्यातील आगळगाव परिसराला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडापलं

SCROLL FOR NEXT