venkaiah-naidu 
देश

आर्थिक व्यवहारांवरून वेंकय्या नायडू लक्ष्य

सकाळन्यूजनेटवर्क

पुत्र, कन्येला फायद्याबाबत खुलाशाची कॉंग्रेसची मागणी

नवी दिल्ली: राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार वेंकय्या नायडू यांना आर्थिक व्यवहारांवरून कॉंग्रेसने लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. नायडू यांचे पुत्र आणि कन्येला झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या फायद्याबद्दल पारदर्शकपणे खुलासा केला जावा, असे आव्हान कॉंग्रेसने दिले आहे.

कॉंग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी पत्रकार परिषद घेऊन नायडू यांना लक्ष्य केले. राजकीय नेतृत्वाने पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची सातत्याने वकिली करणाऱ्या नायडूंनी कॉंग्रेसच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, अशी मागणी जयराम यांनी केली. ते म्हणाले, की वेंकय्या नायडू यांची कन्या व्यवस्थापकीय विश्वस्त असलेल्या "स्वर्णभारत ट्रस्ट'ला तेलंगण सरकारने 20 जून 2017 ला दोन कोटी रुपयांची सूट दिली. तसेच जुलै 2014 मध्ये तेलंगण सरकारने विनानिविदा 270 कोटी रुपयांची वाहन खरेदी केली होती. ही वाहन खरेदी ज्या दोन डिलरकडून झाली, त्यातील एक तेलंगणचे मुख्यमंत्री यांचे पुत्र तर दुसरे डिलर वेंकय्या नायडू यांचे पुत्र होते.

याव्यतिरिक्त, सहा एप्रिल 2011 ला सर्वोच्च न्यायालयाने आदेश काढून, मध्य प्रदेश सरकारने कुशाभाऊ ठाकरे मेमोरियल ट्रस्टला दिलेला 20 एकरचा 600 कोटी रुपयांचा भूखंड देण्याचा निर्णय रद्दबातल ठरवला. खुद्द वेंकय्या नायडू हे या ट्रस्टचे अध्यक्ष होते आणि या व्यवहारावर सर्वोच्च न्यायालयाने कडक शब्दांत ताशेरे ओढले होते. एवढेच नव्हे तर, नेल्लोर येथे भूमीहिनांसाठी राखीव असलेला भूखंड वेंकय्या नायडू यांच्या नावावर होता. हा भूखंड सात ऑगस्ट 2002 ला वेंकय्या नायडू यांनी जिल्हा प्रशासनाला परत केला. ही सर्व माहिती खरी आहे काय, असा प्रश्‍न रमेश यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी सरकार देणार स्वस्त भाड्याची घरं; शहरात राहणाऱ्यांसाठी मोठी योजना

हिरा ठाकूर यांचा काँग्रेस प्रवेश, भाजपाला मोठा धक्का; राजकीय वर्तुळात खळबळ

MPSC Paper Leak : ‘पुरावा दिल्यास क्षणभरही पदावर राहणार नाही’; एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार

Ketan Agarwal Case : केतनचा बाहेरच्या व्यक्तीमार्फत खून घडवून आणण्याचा विचार; पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांची माहिती

Loha News : पत्नी प्रेमापोटी मूकबधिर तरुणाचे मोबाईल टॉवरवर शोले स्टाईल आंदोलन

SCROLL FOR NEXT