Inauguration of Nrupatung University Amit Shah  sakal
देश

‘एनईपी’मुळे भारत ज्ञानवंताचा देश बनेल : अमित शहा

नृपतुंग विद्यापीठाचे उद्‍घाटन

सकाळ वृत्तसेवा

बंगळूर : नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) शिक्षणात अमुलाग्र बदल घडविणारे असून, या शैक्षणिक धोरणाने भारत ज्ञानवंताचा देश बनेल, असे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मांडले.नृपतुंग विद्यापीठ आवारात विद्यापीठ उद्‍घाटन व शैक्षणिक समुदाय भवनाचा कोनशिला समारंभ आज (ता.३) आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. देशात २३० पेक्षा अधिक विद्यापीठ केंद्राने स्थापले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक क्षेत्रावर लक्ष केंद्रीत केले आहे. येथे नृपतुंग विद्यापीठ उदयास आले आहे, त्याचाच भाग आहे.

विद्यापीठाला राष्ट्रकुटाचे प्रसिध्द राजा नृपतुंग यांचे नाव दिले आहे. त्याबद्दल आनंद वाटतो. विद्यापीठाचे नाव विज्ञान विद्यापीठ होत. ते आता नृपतुंग विद्यापीठ म्हणून ओळखले जाईल. अक्षय तृतियदिनी विद्यापीठाचे उद्‍घाटन झाले आहे, हे चांगले संकेत आहेत, असेही शहा यांनी सांगितले.मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन शैक्षणिक धोरण जारी केले. केजी ते पीजीपर्यंत नवीन बदल घडणार आहेत. नवीन बदलला विरोध झाला. पण, काळ थांबत नाही. नवीन शैक्षणिक धोरण स्वीकारून अंमलबजावणी करणारे पहिले नृपतुंग विद्यापीठ ठरल्याचे त्यांनी सांगितले.केंद्रीय संसदीय व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी, गृहमंत्री आरग ज्ञानेंद्र, उच्च शिक्षण मंत्री डॉ. आश्‍वत्थ नारायण, खासदार पी. सी. मोहन, डीजीपी प्रवीण सूद उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT