Udhayanidhi Stalin  
देश

राष्ट्रपती विधवा असल्याने नव्या संसदेच्या उद्घाटनाला येऊ दिलं नाही, हाच तुमचा सनातन धर्म का?- उदयनिधी

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- सनातन धर्माबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वादग्रस्त ठरलेले नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी पुन्हा एकदा यावर भाष्य केलं आहे. नव्या संसद भवनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती यांना बोलावण्यात आले नाही. त्या विधवा आणि आदिवासी असल्यानेच त्यांना बोलावण्यात आले नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. (new Parliament building inaugurated President of India was not invited)

तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन आणि सरकारमधील मंत्री उदयनिधी हे वारंवार सनातन धर्मावर टिप्पणी करत आहेत. त्यांच्या सनातन धर्मावरील टीकेमुळे भाजप आक्रमक झाली आहे. तरी, उदयनिधी यांनी आपला खाक्या कामय ठेवला आहे. त्यांनी केंद्र सरकारवर घणाघात केलाय. हाच तुमचा सनातन धर्म आहे का? अशी विचारणा त्यांनी केली आहे.

उदयनिधी म्हणाले की, 'नव्या संसद इमारतीचे उद्धाटन करण्यात आले. भाजपने उद्धाटनासाठी तमिळनाडूमधून अधिनाम Adheenams घेतला. पण, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना बोलावण्यात आलं नाही, कारण त्या विधवा आणि आदिवासी समाजातून येतात. हाच सतानत धर्म आहे का? म्हणून आम्ही याविरुद्ध आवाज उठवत राहू.' मदुराई येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

उदयनिधी यांच्या या ताज्या वक्तव्यावरुन भाजप पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे. उदयनिधी यांनी याआधी सनातन धर्मावर टीका करताना म्हटलं होतं की, 'सनातन धर्मात बदल करण्याची काही गरज नाही. याला पूर्ण नष्टच करायला हवे. सनातन धर्म मलेरिया, डेंगू, कोरोनाच्या विषाणूसारखा आहे. सनातन धर्मामुळेच देशात जात व्यवस्था टिकून आहे.'

उदयनिधी यांच्या वक्तव्यानंतर भाजपने रान उठवलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही निशाणा साधत, 'या लोकांना आपला धर्म नष्ट करायचा आहे' अशी टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही उदयनिधी यांना योग्य प्रत्युत्तर देण्याच्या सूचना मंत्र्यांना केल्याचे सांगितले जाते. लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत. त्यामुळे या मुद्द्यावरुन इंडिया आघाडीला घेरण्याचा प्रयत्न भाजपचा असल्याचं बोललं जातं. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BREAKING: रोहित शर्मा Lords वर निवृत्ती जाहीर करणार? IND vs ENG तिसरा वन डे सामना शेवटचा, धक्का देणारी Inside Story

VIDEO : मुंबईत मोठी दुर्घटना! ११व्या मजल्यावरून क्रेन कोसळली, १२ गाड्यांचं मोठं नुकसान, एक जण जखमी...

Pune Birth-Death Records: जन्म-मृत्यू दाखल्यांतील दुरुस्तीला उच्च न्यायालयाची हिरवी झेंडी; पुणे महापालिकेला अधिकार, प्रलंबित अर्ज निकाली काढण्याचे आदेश

RAVINDRA JADEJA: रवींद्र जडेजाचं वनडे करिअर संपणार? 2027 विश्वचषकासाठी डच्चू, अक्षर पटेलला प्राधान्य; अहवालात मोठा दावा

Akkalkot Hannur coordination meet: हन्नूरमध्ये ‘सहविचार सभा’द्वारे चपळगाव गटातील १८ गावांच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा; प्रशासन-लोकप्रतिनिधींचा अभिनव समन्वय

SCROLL FOR NEXT