police Viral video eSakal
देश

Viral Video : एक डझन पोलीसही त्याला थांबवू शकले नाहीत... व्हॅनमध्ये बसता बसता पळून गेला आरोपी; व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे.

Sudesh

काही दिवसांपूर्वीच ससून रुग्णालयातून अमली पदार्थांची तस्करी करणारा ललित पाटील फरार झाला होता. यानंतर आता ड्रग्ज प्रकरणातच एक नायजेरियन नागरिक पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

झटपट न्यूज या एक्स हँडलवरुन एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये दिसतंय की काही पोलीस एका व्यक्तीला ताब्यात घेऊन चालले आहेत. पोलीस या व्यक्तीला व्हॅनमध्ये बसवत असतानाच हा अचानक पळून जातो.

याठिकाणी सुमारे दहा ते बारा पोलीस असताना तो सुसाट पळून जातो. काही पोलीस त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये एक पोलीस खाली पडतो, तर काही दुसऱ्या बाजूने जाऊन त्याला पकडण्याचा प्रयत्न करतात. मात्र, तो आरोपी पुढे पळून जातो.

हा आरोपी नायजेरियन असून, नवी मुंबईमधून त्याला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात येत होती; असं या व्हिडिओच्या डिस्क्रीप्शनमध्ये सांगितलं आहे. तसंच व्हिडिओमध्ये दिसतंय की या व्यक्तीला श्री अरिहंत प्लाझा नावाच्या इमारतीमधून बाहेर आणलं होतं.

हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, आणि पुढे त्या आरोपीचं काय झालं याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. मात्र, सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT