No Confidence Motion 
देश

No Confidence Motion : एक तासाच्या भाषणात मोदींकडून मणिपूरबाबत चकार शब्द नाही; विरोधक आक्रमक

रवींद्र देशमुख

नवी दिल्ली - मणिपूरमधील महिला अत्याचाराच्या घटनेवरून विरोधीपक्ष आक्रमक झाला आहे. त्यातच काही दिवसांपूर्वीच विरोधकांनी इंडिया नावाची आघाडी तयार केली असून एकतेने मोदी सरकारविरुद्ध मोर्चा उघडला आहे. तर तिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मणिपूरमधील हिंसाचारावरून आपली भूमिका स्पष्ट केली नाही. आजअखेर मोदींनी सभागृहात भाषण केलं. मात्र एक तासाच्या भाषणात मोदींनी मणिपूरचा चकार शब्द काढला नाही.

मोदींनी अविश्वास ठरावाच्या प्रस्तावर भाषण करताना मोदींनी विरोधकांवर चौफेर टीका केली. यावेळी त्यांनी सर्व राज्यातील स्थिती सांगत काँग्रेसवर हल्लाबोल केला. यावेळी मोदींनी बिहार, तामिळनाडू, उत्तर प्रदेश राज्यातील काँग्रेसची स्थिती सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी विरोधक मणिपूर-मणिपूरच्या घोषणाबाजी करत आहेत.

मोदींचे आतापर्यंत एक तासाहून अधिक वेळ भाषण झाले. मात्र अद्याप मोदींनी मणिपूरचा उल्लेखही भाषणात केला नाही. यावरून विरोधक आक्रमक झाले असून सभागृहात मणिपूरच्या घोषणा देत आहेत.

वास्तविक पाहता, विरोधकांनी सरकारविरोधात अविश्वास प्रस्तावच मणिपूर मुद्दावर मोदींनी भूमिका स्पष्ट करावी, यासाठी आणला होता. मात्र अजुनही मोदी मणिपूरवर बोलत नसल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: फॉर्मात आलेल्या चेन्नई सुपर किंग्जचे पारडे जड; सलग दोन पराभव झालेल्या गुजरात टायटन्सविरुद्ध आज सामना,पाहा संभावित Playing XI

Latest Marathi News Live Update: महामुंबईत उन्हाचा चटका, महाडमध्ये पारा ४५ अंशावर

Himalayan Climate Change: हिंदुकुश हिमालयात हिमसाठ्यात घट; सलग चौथ्या वर्षी नीचांक, गंगा खोऱ्यात मात्र बर्फाचे प्रमाण अधिक..

Shahuwadi Crime News : शाहूवाडीत धक्कादायक प्रकार! लग्नाचे आमिष दाखवून वसीमने ५ वर्षे अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार

शक्तिपीठ महामार्गामुळे दर वाढणार, जमीन खरेदी करायला लावून फसवणूक; खरातचा स्वत:च्या CAलाच पावणेनऊ कोटींचा गंडा

SCROLL FOR NEXT