No Confidence Motion 
देश

No Confidence Motion : फिल्डींग विरोधकांनी लावली, पण चौकार-षटकार आम्हीच लगावले; मोदींचा टोला

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विरोधकांनी आणलेल्या अविश्वास ठरावावर चौफेर फटकेबाजी करताना मांडलेला अविश्वास ठराव आमच्या सरकारसाठी नाहीच, असं म्हटलं. तसेच २०१८ मध्ये अशाच प्रकारे त्यांनी अविश्वास प्रस्ताव आणला होता. मात्र त्यावेळी विरोधकाकडे असलेली मत कमी झाली होती, असंही मोदींनी म्हटलं.

पंतप्रधान मोदी म्हणाले, विरोधकांनी अविश्वास ठराव आणला. देव खूपच दयाळू असून देव असंच कोणाला तरी माध्यम बनवून घटना घडवत असतो. आज तेच झालं. विरोधकांच्या रुपाने ही घटना घडत आहे. याआधी २०१८ मध्ये देखील विरोधकांनी अविश्वास ठराव आणला होता. तेव्हा एनडीएचे बहुमत दिसले होते. त्यानंतर २०१९ मध्ये पुन्हा जनतेच्या बहुमताने आम्ही विजयी झालो. तसेच २०२४ मध्ये देखील पूर्ण बहुमताने आम्ही विजयी होऊ, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

मागील तीन दिवसांपासून सभागृहाचं कामकाज बघतोय. त्यापैकी एक दिवस कामकाज चालू दिलं नाही. अधिवेशनात विरोधकांनी जबरदस्त फिल्डींग लावली. पण चौकार आणि षटकार आमच्याकडूनच लागल्याचा टोला मोदींनी विरोधकांना लगावला.

दरम्यान २०१८ मध्ये मी तुम्हाला काम करण्याची संधी दिली होती. २०१९ मध्ये आमचा विजय झाला. त्यामुळे पुन्हा पाच वर्षे दिली होती. २०२४ पर्यंत देखील तुम्ही काम केलं नसल्याचं मोदी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajya Sabha Election : 'ऑपरेशन कमळ'ची भीती की क्रॉस व्होटिंगचं संकट? राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा मोठा गेम प्लॅन; चार्टर्ड विमानाने 63 आमदारांना हलवले

Parbhani: मृग नक्षत्रावर बळिराजाच्या आशा;खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी विभागाने दिला ‘हा’ मोलाचा सल्ला

Navi Mumbai News: डेटा सेंटरमुळे संकट? नवी मुंबईत विरोध, माजी उपमहापौर आक्रमक

IND vs AFG: हार्दिक पांड्याच्या जागी टीम इंडियात कोणाला जागा मिळणार? मुंबईचा ऑल राऊंडर दोन वर्षानंतर संघात परतणार...

Kolhapur Jaggery Market : कोल्हापुरात ‘अन्न औषध’ विभाग सतर्क; कारवाईच्या भितीने गूळ उत्पादन बंद, मार्केटमध्ये गुळाची आवक घटली

SCROLL FOR NEXT