Crime News Esakal
देश

Crime News: आधी चाकूने केले सपासप वार, नंतर दुचाकीला बांधलं अन् फरफटत...; नोएडातील हृदयद्रावक घटना

Crime News: आरोपींना अटक केल्यानंतर पोलीस त्यांना चाकू जप्त करण्यासाठी घेऊन जात असताना वाटेत त्यांनी पोलीस पथकावर हल्ला केला. यानंतर पोलिसांनी झाडलेली गोळी त्याच्या पायाला लागल्याने तो जखमी झाला.

अंकिता खाणे (Ankita Khane)

दिल्लीला लागून असलेल्या नोएडातील सेक्टर-४९ पोलीस स्टेशन हद्दीतील बरौला गावात पुर्ववैमनस्यातून एका तरुणाची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. आधी तरुणावर चाकूने सपासप वार केल्यानंतर हल्लेखोरांनी त्याच्या पायाला दोरी बांधून दुचाकीच्या पाठीमागून फरफटत नेलं. जखमी तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता, त्याचा मृत्यू झाला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आरोपींना अटक केल्यानंतर पोलीस त्यांना चाकू जप्त करण्यासाठी घेऊन जात असताना वाटेत त्यांनी पोलीस पथकावर हल्ला केला. यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ चालवलेल्या गोळ्या दोन्ही आरोपींच्या पायाला लागल्याने ते जखमी झाले.

नोएडातील बरौला गावात एका तरुणाला बाईकला बांधून ओढच नेण्यात आले. चाकूहल्ला करणारे आरोपी त्याला बरौला चौकीत घेऊन गेले. चाकू हल्ल्यात पीडित तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर काही लोकांनी बरौला चौकीची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला.

बरौला येथे राहणारा अनुज हा रुग्णालयात काम करतो आणि त्याचा चुलत भाऊ नितीन याचा दुधाचा व्यवसाय आहे. शनिवारी रात्री अनुज आणि नितीन यांचा मेहंदी हसनसोबत वाद झाला. यानंतर अनुज आणि नितीनने मेहंदी हसनवर चाकूने वार करून त्याला दुचाकीच्या मागे बांधून गावात फरफटत नेले. यात मेहंदी हसनचा मृत्यू झाला.

आज (रविवारी) याबाबत माहिती देताना नोएडा पोलिसांनी सांगितले की, आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास बरौला कल्व्हर्टजवळ अनुज आणि नितीन या दोघांनी मेहंदी हसनची हत्या केली. पोलीस स्टेशन सेक्टर-49 च्या बरौला गावात या घटनेवेळी वापरलेले शस्त्र जप्त करताना चकमक झाली. या चकमकीत अनुज आणि नितीन हे दोघेही पोलिसांच्या गोळ्यांमुळे जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दोघांविरुद्ध संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करून ठोस कारवाई करण्यात येत आहे.

नोएडाचे डीसीपी हरीश चंदर माहिती देताना म्हणाले की, 2018 साली मेहंदी हसनने अनुजच्या वडिलांना मारहाण करून जखमी केले होते. यानंतर मेहंदी हसनविरुद्ध स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हापासून अनुजच्या मनात मेहंदी हसनविरुद्ध राग होता. नुकतेच मेहंदी हसन आणि अनुज यांच्यात कोर्टातही बाचाबाची झाली होती. यावरून दोघांमध्ये तणाव निर्माण झाला होता. शनिवारी रात्रीही अनुजचा मेहंदी हसनसोबत वाद झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather: सुखावणारी बातमी! मुंबई, पुण्यासह मराठवाड्यात पावसाचं पुनरागमन; हवामान विभागाची महत्त्वाची अपडेट

उद्या मी मातृत्व स्वीकारलं तर... आई होण्याबद्दल पहिल्यादांच बोलली सई ताम्हणकर; म्हणते- आमच्या क्षेत्रात...

Pune University Result Delay: पुणे विद्यापीठाच्या भाषा भवनातील निकाल १०० दिवसांनंतरही प्रलंबित; ३०० हून अधिक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

शनीचे महासंक्रमण! 'या' ५ राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ; नोकरी आणि व्यवसायात प्रचंड यशाचा योग

Katraj Accident : कात्रज-कोंढवा रस्त्यावर भीषण अपघात; विद्यार्थिनीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT