Corona Vaccine file photo
देश

कोविशील्डच्या दुसऱ्या डोससाठीचा कालावधी पुन्हा बदलणार; NTAGI ची शिफारस

कोरोनाची घटती संख्या आणि लसीकरणाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर ही शिफारस करण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : कोरोना विरोधात कोविशील्डचा डोस घेतलेल्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी असून पहिल्या डोसनंतर दुसऱ्या डोससाठी आता चार महिने वाट पाहावी लागणार नाहीये. कारण नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशनने (NTAGI), कोविशील्ड लसीकरणाच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसमधील अंतर कमी करण्याची शिफारस केंद्राला केली आहे. शिफारसीनुसार कोविशील्डचा दुसरा डोस 8 ते 16 आठवड्यांच्या दरम्यान देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. देशातील कोरोना रुग्णांची घटती संख्या आणि लसीकरणाच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर ही शिफारस करण्यात आली आहे. याबाबत एनडीटिव्हीने वृत्त प्रकाशित केले आहे.

सध्या, NTAGI ने कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याच्या प्रस्ताव प्रत्यक्षात अंमलात येणे बाकी असून, सल्लागार गटाचा प्रस्ताव जागतिक स्तरावर करण्यात आलेल्या अलीकडील काही वैज्ञानिक अभ्यासांच्या आधारे तयार करण्यात आला आहे. दरम्यान, सरकारने या प्रस्तावाला मान्यता दिल्यास लाभार्थ्यांना कोविशील्डचा दुसरा डोस जलद मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, असे सांगण्यात आले आहे.

सध्या देशात 60 ते 70 दशलक्ष लोक असे आहेत ज्यांना या लसीचा दुसरा डोस मिळालेला नाही. यापूर्वी 13 मे 2021 रोजी केंद्र सरकारने कोविशील्डच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसमधील अंतर 6 ते 8 आठवड्यांवरून 12 ते 16 आठवड्यांपर्यंत वाढवले ​होते. याबाबतही NTAGI ने आरोग्य मंत्रालयाला प्रस्ताव दिला होता. सध्या लसीकरण धोरणांतर्गत, कोविडशील्डच्या पहिल्या डोसनंतर 12 ते 16 आठवड्यांनंतर दुसरा डोस दिला जात असून, NTAGI ने भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनच्या दोन डोसमधील 28 दिवसांच्या कालावधीत बदल केलेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Wangchuk Protest : 'मी दोन-चार दिवसांत मरणारा नाही'; सोनम वांगचुक यांचे सरकारला थेट आव्हान, २० जुलैच्या 'चलो संसद' मोर्चासाठी जनतेला आवाहन

Maharashtra farmer: मोठी घोषणा! शेतकऱ्यांचे ₹48 हजार कोटींचे वीजबिल माफ; वर्षाअखेरीस 12 तास मोफत दिवसा वीज, कर्जमाफीनंतर आणखी दिलासा

Maharashtra Weather Update : मध्य महाराष्ट्र- मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी

Satara News: वर्षासरींत आली आनंदवारी! ज्ञानेश्‍वर माउलींचे सातारा जिल्ह्यात आगमन; हजारो वारकऱ्यांच्या जयघोषात भक्तिमय वातावरण

Vaibhav Sooryavanshi: इंग्लंडमधील अपयशानंतर १५ वर्षांचा वैभव 'बॅक टू वर्क; दौऱ्यावरून परताच घरी राहण्याऐवजी कुठे गेलाय पाहा Video

SCROLL FOR NEXT