OLA CEo Bhavish Agrawal Sakal
देश

वागणं जगाच्या वेगळं! OLA चे CEO आहात का शाळेतले शिक्षक? कर्मचाऱ्यांना अजब शिक्षा

एका कर्मचाऱ्याला तर त्यांनी कंपनीच्या बाहेर शिक्षा म्हणून पळवलं.

सकाळ डिजिटल टीम

ओला कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भावीश अग्रवाल यांच्या उर्मट आणि कठोर वागण्याबद्दल कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच काही खुलासे केले आहेत. ओलाच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य आणि कर्मचारीही सीईओ अग्रवालांच्या वागण्यावर नाराज असल्याचं समोर येत आहे. ओला इलेक्ट्रिक कंपनीमध्ये गेल्या काही वर्षांपासून वातावरण जरा तापलेलं आहे. त्याबद्दलच माहिती घेण्यात आली आहे.

ब्लुमबर्गला ओलाच्या काही माजी कर्मचाऱ्यांनी मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे. अग्रवाल यांनी काही मीटिंग्समध्ये प्रेझेंटेशन्स थांबवली, फाडली आणि कारण काय तर पेज नंबर दिलेले नाहीत. शिवाय, त्यांनी स्टाफ आणि टीमला निरुपयोगी म्हणत पंजाबीतून अपशब्दही वापरले. अग्रवाल यांच्या अशा वागण्याने अनेकदा तासभराची मीटिंग १० मिनिटांतच गुंडाळावी लागली. अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरुन अग्रवाल चिडचिड करतात. मग ते कारण अगदी काहीही असतं म्हणजे अगदी मेमोमधलं वाक्य चुकलं, पेपर क्लिप तुटली, प्रिंटींग पेपरची खराब क्वालिटी असं अगदी काहीही.

बरं या सगळ्याबद्दल अग्रवाल यांना विचारलं असता ते सांगतात की, आमच्या कामाच्या पद्धतीसोबत जुळवून घेणं सगळ्यांनाच जमत नाही. कामाची पद्धत कशी असावी याबद्दल असा काहीही ठरवून दिलेला नियम नाही.

एक घटना तर अशी घडली की अग्रवाल यांनी एका कर्मचाऱ्याला एकरभरात पसरलेल्या ओला फॅक्टरीच्या पळत तीन फेऱ्या मारायला लावल्या. कारण काय तर त्याने दार उघडं ठेवलं. अग्रवाल यांचं म्हणणं आहे की, मला अशी कंपनी उभारायची आहे जिचा प्रभाव दीर्घकाळ राहील. मग त्यासाठी लोकांना चुकीच्या पद्धतीने धारेवर धरायला लागलं तरी हरकत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

५ सामने, ३० चौकार, २९ षटकार अन् ३५५ धावा... Vaibhav Sooryavanshi ची इंग्लंडमधील कामगिरी भारताला विचार करायला लावणारी..

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Ramtirth Waterfall : पांढराशुभ्र फेस अन् खळखळणारा आवाज! आंबोलीतील प्रसिद्ध रामतीर्थ धबधबा प्रवाहित; पावसाच्या पाण्यामुळं खुललं सौंदर्य, पर्यटकांची गर्दी

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT