CM Bhagwant Mann esakal
देश

Bhagwant Mann : पंजाबमध्ये 'एक आमदार, एक पेन्शन' विधेयकाला मंजुरी

पंजाबमध्ये एकापेक्षा जास्त 'पेन्शन' देणारा अनेक दशकापासूनचा जुना कायदा संपुष्टात आलाय.

सकाळ डिजिटल टीम

पंजाबमध्ये एकापेक्षा जास्त 'पेन्शन' देणारा अनेक दशकापासूनचा जुना कायदा संपुष्टात आलाय.

पंजाबमध्ये (Punjab) एकापेक्षा जास्त 'पेन्शन' देणारा अनेक दशकापासूनचा जुना कायदा संपुष्टात आलाय. राज्यपाल बनवारीलाल पुरोहित (Governor Banwarilal Purohit) यांनी 'एक आमदार, एक पेन्शन' (One MLA One Pension Bill) या कायद्याला मंजुरी दिलीय. पंजाबमध्ये मान सरकारनं मंजूर केलेल्या विधेयकाला राज्यपालांची मंजुरी मिळाल्यानंतर अधिसूचना जारी करण्यात आलीय.

त्यामुळं आतापासून आमदारांना केवळ एका टर्मसाठी पेन्शन मिळणार आहे. याबाबत माहिती देताना मुख्यमंत्री भगवंत मान (CM Bhagwant Mann) यांनी ट्विट करून सांगितलंय की, 'मला पंजाबी लोकांना कळवताना अतिशय आनंद होत आहे की, माननीय राज्यपालजी यांनी 'एक आमदार - एक पेन्शन' हा विधेयक मंजूर केला आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आलीय. त्यामुळं जनतेच्या करात मोठी बचत होणार आहे, असं त्यांनी नमूद केलंय.

250 माजी आमदार पेन्शनाचा घेत आहेत लाभ

एक टर्म पूर्ण केल्यानंतर, कोणत्याही आमदाराला 75 हजार रुपये पेन्शन मिळते. यानंतर त्यांना 75 हजारांव्यतिरिक्त पुढील कार्यकाळासाठी 66 टक्के पेन्शनची रक्कम उपलब्ध आहे. या विधेयकापूर्वी एखादा आमदार पाच वेळा निवडणूक जिंकला, तर त्याला पाच वेळा पेन्शन मिळू शकते, असा नियम होता. सध्या सुमारे 250 माजी आमदार पेन्शन सेवेचा लाभ घेत आहेत. त्याचबरोबर एक आमदार, एक पेन्शन कायदा लागू झाल्यानंतर आतापासून एका आमदाराला एकच पेन्शन मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संविधानात बसेल ते मिळेल, कुणाच्या ताटातलं देणार नाही; मराठा आरक्षणावर फडणवीसांची प्रतिक्रिया, जरांगे म्हणाले, ताटच उरणार नाही

सभ्य रहा, नीट कपडे परिधान करा! भाडेकरू मुलींना घरमालकाचा सल्ला, रूममध्ये लावला CCTV कॅमेरा

Marathi News Live Updates : सरकारने आवश्यक ते निर्णय घेतलेत, शिष्टमंडळ जरांगेंकडे जाणार नाही : विखे-पाटील

Sainik Takli MIDC protest : सैनिक टाकळी एमआयडीसीविरोधात शिरोळमध्ये राडा; प्रशासनाच्या कार्यालयाचे गेट तोडले, काचा फोडल्या, पोलिस कर्मचारी जखमी

Duleep Trophy 2026: हा, मुलगा कमाल आहे! वैभव सूर्यवंशीच्या सांगण्यावरून DRS घेतला अन् सामन्यात ट्विस्ट आला Video Viral

SCROLL FOR NEXT