Corona Positive Baby Sakal
देश

अवघ्या एका महिन्याच्या बाळाने केलीय कोरोनावर मात; पाहा व्हिडिओ

हॉस्पिटलने १४ जानेवारीला ट्वीट करुन हे एक महिन्याचं बाळ कोरोनामुक्त झाल्याचं स्पष्ट केलं आहे.

दत्ता लवांडे

दिल्ली : देशभरात आणि जगभरात कोरोनाने कहर केला असून कित्येक जणांना या साथीत आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या जगभरात कोरोनाची तिसरी लाट सुरु असून त्यात ओमिक्रॉनच्या साथीची भर पडली आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना दिल्लीच्या एका हॉस्पिटलमधून एका महिन्याचं बाळ कोरोनातून बरं झाल्याची बातमी मिळाली आहे. (Corona Updates)

दरम्यान या एका महिन्याच्या बाळाला जन्मताच कानाचा आजार असावा म्हणून बाळाला दिल्लीच्या मूळचंद हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं. हॉस्पिटलमध्ये तपासणी दरम्यान बाळाला कोरोनाची लागण झाल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर बाळावर उपचार करण्यात आले व बाळ कोरोनातून बरं झाल्यानंतर त्याची कोरोना चाचणी अहवाल निगेटीव्ह आल्यावर हॉस्पिटलने १४ जानेवारीला ट्वीट करुन हे एक महिन्याचं बाळ कोरोनामुक्त झाल्याचं स्पष्ट केलं आहे. (One Months Baby recover From Corona Infection)

हॉस्पिटलने बाळाचा व्हिडओ ट्विट करत म्हटलंय की, एका महिन्याचं बाळ कानाच्या आजारामुळे भरती करण्यात आलं आणि त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. कोरोनातून मुक्त झाल्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला. विलगीकरण कक्षात डॉक्टरांच्या टीमचे बाळाची काळजी घेतल्याचं ट्विटमध्ये म्हटलंय.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत जास्त वयाच्या बालकांना संसर्ग होण्याची भिती वाढली असून प्रौढ व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्यानंतर झपाट्याने संसर्ग होतो. डेल्टा आणि पहिल्या लाटेतील कोरोनाच्या तुलनेत ओमिक्रॉनचा संसर्ग लहान मुलांमध्ये झपाट्याने होत असल्याचं आढळून आलंय.

३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण चालू झाले असून कोव्हॅक्सिन चा पहिला डोस देण्यात येत आहे. आत्तापर्यंत जवळपास ३ कोटी मुलांचे लसीकरण झाल्याची माहीती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

First Solo Trip Tips: पहिल्यांदाच सोलो ट्रिपला जाताय? मग हे ‘गोल्डन रूल्स’ नक्की लक्षात ठेवा!

Marathi News Live Updates : तानसा तलावात ९८.३७ टक्के पाणीसाठा, इतर तलावांमध्ये किती?

Ram Mandir Trust: राम मंदिर ट्रस्टचे महासचिव स्वामी गोविंद देवगिरीजींचा महाराष्ट्र दौरा संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी नतमस्तक होऊन सुरू

Alandi Spiritual Visit: आळंदीत चैतन्यमय वातावरण; संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचे दर्शन घेत बिट्टा यांचे गौरवोद्गार

SCROLL FOR NEXT