medicine 
देश

Painkiller : पेनकिलर खाताय तर सावधान! मेफेनॅमिक अ‍ॅसिडच्या वापरासंदर्भात सरकारने दिला इशारा

Sudesh

शरीराचा एखादा भाग दुखत असल्यास त्यासाठी पेनकिलर टॅबलेट खाणे ही आता अगदी सामान्य बाब झाली आहे. कित्येक लोक या गोळीचं सेवन करतात. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तुम्ही जर ही गोळी घेत असाल, तर तुमच्यासाठी एक गंभीर बातमी आहे. मेफेनॅमिक अ‍ॅसिडच्या वापरासंदर्भात सरकारने अलर्ट दिला

भारतीय फार्माकोपिया आयोगाने (IPC) या पेनकिलर गोळीबाबत एक इशारा दिला आहे. या गोळीमध्ये असणारा मेफेनॅमिक अ‍ॅसिड हा आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकतो. DRESS सिंड्रोम सारख्या अ‍ॅलर्जी रिअ‍ॅक्शन यामुळे ट्रिगर होऊ शकतात, असं आयपीसीने म्हटलं आहे.

मेफेनॅमिक अॅसिड (आम्ल), मेफ्ताल आणि मेफ्ताल-स्पास ह्या औषधांच्या स्वरूपात, भारताशिवाय अमेरिका, ग्रेट ब्रिटन जपान आदी देशांतही गेल्या चार दशकांहून अधिक काळापासून प्रिस्क्राइब केले जात आहे.

काय आहेत दुष्परिणाम?

ड्रेस सिंड्रोम ही एक गंभीर अ‍ॅलर्जी प्रतिक्रिया आहे. जगभरातील सुमारे 10 टक्के नागरिकांना हे जाणवतं. यामुळे ताप येणे, त्वचेवर लाल चट्टे येणे अशी लक्षणे दिसतात. तसंच शरीराच्या आतील अवयवांना देखील यामुळे नुकसान होतं. विशेष म्हणजे याचे दुष्परिणाम हे गोळी घेतल्यानंतर दोन ते आठ आठवड्यांनंतर देखील दिसू शकतात.

परिणाम आधीपासून माहिती

यावर प्रतिक्रिया देताना काही डॉक्टरांनी म्हटलं, की मेफ्टाल सारख्या गोळ्यांचे दुष्परिणाम हे अतिशय दुर्मिळ आणि आधीपासूनच माहिती असणारे आहेत. त्यामुळेच रुग्णांना अगदी ठराविक वेळीच हे प्रिस्क्राईब केले जाते. आतापर्यंत याचे अगदी गंभीर परिणाम समोर आले नसल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. तसंच, गोळ्यांची रिअ‍ॅक्शन ही प्रत्येक रुग्णानुसार बदलू शकते, असंही डॉक्टरांनी म्हटलं आहे.

भारतात मोठा वापर

मेफ्टाल ही एक प्रिस्क्राईब्ड गोळी असली, तरी देशात कित्येक लोक थेट मेडिकलमधून ती घेतात. मासिक पाळीच्या वेदना, डोकेदुखी, सांधेदुखी अशा गोष्टींसाठी या गोळीचा वापर करतात. सोबतच, लहान मुलांना ताप आल्यानंतर देखील ही गोळी वापरतात. Meftal, Mefkind, Mefanorm, Ibuclin P अशा विविध नावांनी ही गोळी उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सीजेपीच्या 'तिरंगा मार्च'ला आडकाठी! दिल्लीतील सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा निर्णय; अभिजित दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, '100 ठिकाणी...'

Drunk and Driver : कोथरूडमध्ये ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’चा थरार; तीन ते चार जण किरकोळ जखमी, २४ वर्षीय कारचालक विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

Mangalwedha News : मंगळवेढा तालुक्यात 4777 कुटुंबाचे धान्य ऐन दुष्काळात बंद

Manchar Water Issue : आंबेगाव तालुक्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर तातडीने नियोजन करा; प्रांताधिकारी अर्चना तांबे यांचे अधिकाऱ्यांना आदेश

PM नरेंद्र मोदींना भेटले Asiad पदकविजेते भारतीय खेळाडू, वैभव सूर्यवंशीच्या रिअॅक्शनचा Video होतोय Viral

SCROLL FOR NEXT