pm imran khan pm imran khan
देश

अविश्वास प्रस्तावापूर्वी पाकिस्तानात 24 खासदारांनी घेतला मोठा निर्णय

संसदेत मांडण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावावर २७ मार्च रोजी मतदान आहे.

सकाळ डिजिटल टीम

संसदेत मांडण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावावर २७ मार्च रोजी मतदान आहे.

इम्रान खान (Imran Khan) सरकारविरोधात संसदेत मांडण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावामुळे सरकार अडचणीत आले आहे. या प्रस्तावानंतर पाकिस्तानमध्ये राजकीय हालचाली वाढल्या आहेत. त्यातच आता तहरीक-ए-इन्साफच्या (PTI) २४ खासदारांनी इस्लामाबादमधील सिंध हाऊसमध्ये आश्रय घेतला आहे. इम्रान खान सरकार विरोधात मतदान करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई पंतप्रधानांनी करू नये अशी हमी देणार असतील तर ते पुन्हा पक्षात येतील असा दावा नॅशनल असेंब्ली सदस्य राजा रियाझ यांनी केला आहे. त्यांनी एका खासगी माध्यमांशी बोलताना हि माहिती दिली. संसदेत मांडण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावावर २७ मार्च रोजी मतदान आहे.

पाकिस्तानचे (Pakistan)पंतप्रधान इम्रान खान यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना अविश्वास प्रस्ताव अयशस्वी झाल्यास परिणामांना सामोरे जाण्यास तयार रहा असा इशारा दिला. त्यांच्या या इशाऱ्याला घाबरून खासदारांनी सिंध हाऊसचा आश्रय घेतला आहे. तसेच भीतीपोटी खासदार कॅमेरासमोर येण्यास टाळाटाळ करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

पीटीआयचे एमएनए मलिक नवाब शेर वसीर आणि रियाझ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, पीटीआयचे सुमारे २४ सदस्य सध्या सिंध हाऊसमध्ये राहत आहेत. अनेक मंत्र्यांनी याठिकाणी येण्याची तयारी दर्शवली आहे. त्याचबरोबर पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्तावाला मतदान करण्यासाठी हे खासदार तयार असल्याची माहिती ही त्यांनी दिली आहे.

आकडे काय सांगतात

अविश्वास प्रस्ताव यशस्वी होण्यासाठी संसदेच्या कनिष्ठ सभागृहातील एकूण ३४२ सदस्यांपैकी १७२ सदस्यांच्या बहुमताची आवश्यकता आहे. इम्रान खान यांना अजूनही नॅशनल असेंब्लीमध्ये बहुमत आहे. ज्यामध्ये पीटीआयचे १६६ सदस्य आणि युती भागीदारांचे २३ सदस्य आहेत.विरोधी पक्षाकडे १६३ सदस्य आहेत. सत्ताधारी आघाडीतील काही नाराज आमदार इम्रान खान यांना सरकार पाडण्यासाठी पाठिंबा देतील, अशी आशा विरोधकांना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT