Parliament Winter Session Team eSakal
देश

Winter Session: विरोधक सरकारला भिडणार की कामकाजावर बहिष्कार टाकणार?

Parliament Winter Session: 12 खासदारांच्या निलंबनानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत.

सुधीर काकडे

दिल्ली: लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनाला (Parliament Winter Session) काल सूरूवात झाली. पहिल्याच दिवशी मोठा गदारोळ झाला आणि या गदारोळादरम्यानच सभागृहाने तीन कृषी कायदे रद्द केले. कोणत्याही चर्चेशिवाय हे कायदे रद्द करण्यात आल्याचा आरोप करत विरोधकांनी सभागृहात आक्रमक भूमिका घेतली. यावेळी झालेल्या गोंधळात राज्यसभेच्या तब्बल 12 खासदारांना निलंबित करण्यात आले. निलंबनाची कारवाई झालेल्या या खासदारांमध्ये काँग्रेस, शिवसेना, तृणमूल काँग्रेस, सीपीएम आणि सीपीआयच्या नेत्यांचा सहभाग आहे. त्यामुळे आज आता हे सर्व पक्ष सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकणार की, अध्यक्षांकडे निलंबन मागे घेण्याची विनंती करणार हे पाहावं लागणार आहे.

निलंबनाच्या कारवाईनंतर सर्व विरोधी पक्षाचे नेते आणि सत्ताधारी नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. मात्र या चर्चेत काहीही निष्कर्ष निघू शकलेला नाही. काँग्रेस नेते मलिक्कार्जून खर्गे यांनी सर्व विरोधी पक्ष नेत्यांच्या वतीने सभापतींना निलंबन मागे घेण्याची विनंती करावी आणि ती मान्य न झाल्यास सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकावं असं ठरल्याचं राजदचे खासदार मनोजकुमार झा यांनी सांगितले.

दरम्यान, काँग्रेसने यावर आपली भूमिका स्पष्ट केली नसली तरी, सभागृहाच्या कामकाजापासून दुर जाण्याची भूमिका योग्य नसल्याचं काँग्रेसचं मत असल्याचं समजतंय. कामकाजावर बहिष्कार टाकणे हे टोकांचं पाऊल होईल, त्यामुळे सत्ताधाऱ्यांची वाट मोकळी होईल, आपल्यासा काहीही करून तिथे पोहोचावं लागेल अशी काही काँग्रेस नेत्यांची भूमिका असल्याचं समजतंय. याच सर्व पार्शभूमिवर आज विरोधी पक्ष निर्णय घेणार आहेत. त्यामुळे विरोधक कामकाजावर बहिष्कार टाकणार की सभागृहातून सरकारला धारेवर धरणार हे आज ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET UG Result : अन्सर कीमध्ये ६०९, निकाल लागताच ५४० पण दोन तासांनी १६७ गुण; नीट निकालात गोंधळ, विद्यार्थीनीचे गंभीर आरोप

IND vs ENG: लॉर्ड्सवर रोहित-कोहली रचणार इतिहास! सचिन-द्रविडलाही मागे टाकत करणार '400'चा महाविक्रम

Latest Marathi News Live Update : शिक्षण, आरोग्यसेवा आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याबाबत सरकार अपयशी - AICC सरचिटणीस सचिन पायलट

Beed News: भ्रष्टाचार उघड होताच रातोरात काम सुरू? बीडमध्ये नेमकं काय घडलं?

सोनम वांगचुक यांची प्रकृती कशी आहे? डॉक्टरांनी दिली अधिकृत माहिती, पत्नीचा रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT