ration shop esakal
देश

आता रेशन दुकानातही काढू शकता पासपोर्ट आणि पॅन कार्ड!

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : सर्वसामान्य नागरिकांची पायपीट थांबावी तसेच त्यांना अधिकाधिक सुविधा घराजवळ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने (central government) हे मोठं पाऊल उचललं आहे. यानुसार आता तुम्ही रेशन दुकानातही (ration shops) पासपोर्ट आणि पॅन कार्डसाठी (passport and pan card) अर्ज करू शकता. इतकंच नाही, तर वीज आणि पाण्याचं बिलदेखील रेशन दुकानांमध्ये स्विकारले जाणार आहे. हो हे खरं आहे...केंद्रीय अन्न मंत्रालयाने ई-गव्हर्नन्स सर्व्हिस इंडिया लिमिटेडसोबत ही योजना तयार केली आहे. वाचा सविस्तर...

अशी आहे योजना; लाईट बिल अन् पाण्याचं बिलही

देशातील सर्व रेशन दुकानं आता कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) बनवली जाणार असून अनेक सुविधा नागरिकांना पुरविण्यात येणार आहेत. यानुसार सामान्य नागरिकांना आता रेशन दुकानात पासपोर्ट आणि पॅन कार्डसाठी अर्ज करता येणार आहे. रेशन दुकानांमध्ये पासपोर्टसाठी अर्ज, पॅन कार्डसाठी अर्ज, लाईट बिल भरणे, पाण्याचं बिल भरणे आणि निवडणूक आयोगाशी संबंधित कामांची सुविधादेखील उपलब्ध करून दिली जाण्याची शक्यता आहे. रेशन धान्य दुकान चालवणाऱ्या दुकानदारांना सुविधा पुरविण्याबाबत निवड करता येणार आहे.

रेशन दुकानदारांसमोर पर्याय

रेशन दुकानांमध्ये पासपोर्टसाठी अर्ज, पॅन कार्डसाठी अर्ज, लाईट बिल भरणे, पाण्याचं बिल भरणे आणि निवडणूक आयोगाशी संबंधित कामांची सुविधादेखील उपलब्ध करून दिली जाण्याची शक्यता आहे. CSC अंतर्गत विविध सुविधा पुरवल्या जाणार असल्या तरी आपल्याला योग्य वाटतील अशा सेवांसाठी रेशन दुकानदार अर्ज करू शकतील. या सुविधा रेशन दुकानात उपलब्ध करून देण्याचा पर्याय रेशन दुकानदारांसमोर असणार आहे. या सुविधांचा सर्वसामान्य नागरिकांना चांगलाच उपयोग होणार असून या कामांसाठी करावी लागणारी पायपीट कमी होणार आहे. या सुविधा इतरत्रही उपलब्ध आहेत, यामुळे रेशन दुकानांचं उत्पन्न वाढायलाही मदत होणार आहे. रेशन दुकानातून धान्य खरेदी करतानाच नागरिक पासपोर्ट आणि पॅन कार्डसाठी अर्जही भरू शकणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्री साडे आठ वाजता संबोधित करणार, काय बोलणार?

Sahil Shaikh Story : बापानं गवंडी काम केलं, तर आईनं शेती! लेकानं जिद्दीच्या जोरावर मिळवली खाकी; वाचा पाचवेळा अपयश पचवलेल्या साहिल शेखची प्रेरणादायी यशोगाथा

Latest Marathi News Live Update: पॉश ॲक्टमध्ये बदल होणे गरजेचे - चित्रा वाघ

Parenting Tips : चुकूनही लहान मुलांसमोर करू नका 'या' 5 गोष्टींची चर्चा; नाहीतर लेकरं दुरावतील, आयुष्यभर कुणावर ठेवणार नाहीत विश्वास

वाढलेले केस, सुटलेलं पोट... स्वतःची बॅग स्वतःच घेऊन निघाला ९०चा सुपरस्टार अभिनेता, तुम्ही ओळखलंत का?

SCROLL FOR NEXT