petrol 100 
देश

सलग 10 व्या दिवशी इंधन दरवाढ; पेट्रोल-डिझेलच्या किंमतींचा नवा उच्चांक

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : सरकारी तेल कंपन्यांकडून आज सलग दहाव्या दिवशी देखील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ करण्यात आली आहे. दररोज वाढत्या किंमतींमुळे नवनवे रेकॉर्ड बनत आहेत. कारण दररोजच्या नव्या वाढत्या किंमतींनी पेट्रोल आणि डिझेल आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वोच्च किंमतीला जाऊन पोहोचत आहेत. त्यामुळे हा नवा उच्चांक बनत आहे. तसेही देशातील अनेक भागात पेट्रोलच्या किंमतींनी शंभरी गाठली आहे. लवकरच ही परिस्थिती संपूर्ण भारतात येईल, असं चित्र दिसून येत आहे. आज दहाव्या दिवशी डिझेलच्या किंमतींमध्ये 32 ते 34 पैशांनी वाढ झाली आहे तर पेट्रोलच्या किंमतींमध्ये आज 32 ते 34 पैशांची वाढ झाली आहे. 

दिल्ली आणि मुंबई या दोन प्रमुख शहरांमधील या इंधनांचे भाव हे आतापर्यंतच्या सर्वोच्च स्थानावर आहेत. आज वाढलेल्या किंमतींनंतर दिल्लीतील पेट्रोलचा भाव 89.88 रुपये झाले आहे तर मुंबईमध्ये 96.32 रुपये पेट्रोल झाले आहे. तर दिल्लीमध्ये डिझेलचे भाव सध्या 80.27 रुपये आहे तर मुंबईमध्ये 87.32 रुपये झाले आहे.

अशा आहेत प्रमुख शहरांमधील किंमती  
शहर           डीझेल    पेट्रोल
दिल्ली          80.27    89.88
कोलकाता     83.86    91.11
मुंबई            87.32    96.32
चेन्नई            85.31    91.98
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाज वाटत नाही का? खासदार निधी खर्च होत नसल्यानं कंगना रनौत संतापल्या; म्हणाल्या, निगेटिव्ह प्रचार होतोय, रील्स बनतायत

…म्हणून मुक्ता बर्वेने हिंदीत फार काम केलं नाही, कारण सांगत अभिनेत्री म्हणाली...'ऑडिशन देत असते पण...'

वयाच्या १५व्या वर्षी आई, १७व्या वर्षी वडील गेले... दोनदा बारावीची परीक्षा दिलेल्या पूजाने KBC मध्ये जिंकले १२.५ लाख, अमिताभही अवाक्

Marathi News Live Updates : लाखोंच्या अनुदानात अपहार, महिला तलाठ्याला अटक

Duleep Trophy Final : वैभव सूर्यवंशीने भारताच्या 'Best' गोलंदाजाला झोडले; ४,६,४ असे सुरेख फटके खेचले, पाहात रहावा असा Video

SCROLL FOR NEXT