Check Today's Petrol Diesel Price Updates ई सकाळ
देश

वाढता वाढता वाढे! पेट्रोल-डिझेलच्या दरांनी आजही कापला खिसा

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने आपलं डोकं वर काढलं आहे. गेल्या साधारण दोन आठवड्यांपासून जवळपास दररोजच 80 पैशांनी इंधनाचे दर वाढत असून सामान्यांच्या खिशाला झळ पोहोचत आहे. तेल कंपन्यांनी आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ केली आहे. पेट्रोलचे दर 75 ते 84 पैशांनी वाढले आहेत तर डिझेलचे दर देखील 76 ते 85 पैशांनी वाढले आहेत. दिल्लीमध्ये एक लीटर पेट्रोल 103.41 रुपये प्रति लीटर तर डिझेलचे दर 94.67 रुपये प्रति लीटर मिळत आहे.

मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत 118.41 रुपये तर डिझेलची किंमत 102.64 रुपये प्रति लीटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर 113.03 रुपये झाला आहे तर डिझेलचे दर 97.82 रुपये प्रति लीटर झाला आहे. चेन्नईमध्ये देखील पेट्रोल महागले असून 108.96 रुपये प्रती लीटर झाले आहे तर डिझेल 99.04 रुपये प्रति लीटर झाले आहे.

विरोधकांनी असा आरोप केलाय की, पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमुळे मोदी सरकारने तेल कंपन्यांना पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढवण्यापासून थांबवलं होतं. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाा भाव 112 डॉलर प्रति बॅरल पोहोचल्यानंतर रविवारी तेल कंपन्यांनी डिझेलच्या दरांमध्ये वाढ केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT