Narendra Modi pm modi
देश

PM मोदींनी शेतकऱ्यांना दिलं 35 पिकांच्या व्हरायटीचं गिफ्ट

सकाळ डिजिटल टीम

दुष्काळ, अतिवृष्टीतही टिकतील आणि चांगलं उत्पादन देतील अशी ही नवी पिके आहेत. शेतकऱ्यांचं होणारं नुकसान यामुळे टळेल.

दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला विशेष गुणधर्म असलेली ३५ पीके दिली. एका कार्यक्रमात ते व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यामातून सहभागी झाले होते. या कार्यक्रमात केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर हेसुद्धा उपस्थित होते. यावेळी केंद्रीय मंत्री तोमर यांनी मोदींच्या कामाचे कौतुक करताना म्हटलं की, जेव्हापासून मोदींनी कार्यभार सांभाळला आहे तेव्हापासून कृषी क्षेत्रात नवीन क्रांतीची सुरुवात झालीय.

केंद्रीय कृषीमंत्र्यांनी म्हटलं की, पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात पंतप्रधान पीक विमा योजनेतून ९९ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले. तसंच पीएम किसान सन्मान निधी योजनेतून १ लाख ५८ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले.

देशाला नव्या ३५ प्रकारच्या पीकांची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटवरून दिली. त्यांनी सांगितलं की, विशेष गुणधर्म असलेल्या या पिकांची निर्मिती ही ICAR ने केली आहे. या पिकांच्या मदतीने आपण वातावरण बदल आणि कुपोषणासारख्या गंभीर आव्हानांचा सामना करू शकतो.

भारतात शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान हे अवकाळी पाऊस आणि दुष्काळ यामुळे होते. ICAR ने विकसित केलेली पिके ही यासाठी वेगळी ठरतात. दुष्काळ, अतिवृष्टीतही टिकतील आणि चांगलं उत्पादन देतील अशी ही नवी पिके आहेत. शेतकऱ्यांचं होणारं नुकसान यामुळे टळेल.

दुष्काळात टिकून राहतील असे हरभऱ्याचे वाण, लवकर येणारं सोयाबीन, रोग प्रतिकारक असं भात, गहू, बाजरी, मका या पिकांचा यामध्ये समावेश आहे. यामुळे फक्त शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होईल असं नाही तर त्यासोबत आरोग्याच्या दृष्टीने ही पिको महत्त्वाची ठरणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PNG-LPG Rate: घरगुती गॅसच्या दरांत पुन्हा वाढ! सर्वसामान्यांना मोठा फटका; आता गॅससाठी किती पैसे मोजावे लागणार?

Chhatrapati Sambhajinagar: बनावट आधार कार्ड, परदेशात व्यवहार; केंद्रीय सुरक्षा यंत्रणेने वाळूजमधून युवकाला घेतले ताब्यात, नऊ तास चौकशी

Jalgaon: मामाच्या मुलीशी लग्न ठरलेलं, २५ वर्षीय तरुण अल्पवयीन प्रेयसीसोबत लॉजवर गेला, तिथंच आयुष्य संपवलं; तरुणीसह लॉजचालक ताब्यात

Latest Marathi Update Live: पंढरपूर कुर्डुवाडीत कुस्त्यांची दंगल

रेड एफएम मराठी फिल्म फेस्टिव्हल सीझन ६ चा भव्य आणि दिमाखदार समारोप

SCROLL FOR NEXT