Narendra Modi Sakal
देश

PM मोदी आजपासून अमेरिका दौऱ्यावर; UNGA ला करणार संबोधित

सकाळ डिजिटल टीम

संयुक्त राष्ट्राच्या आमसभेला संबोधनासह जगातील नेत्यांची भेटही मोदी घेणार आहेत.

संयुक्त राष्ट्राच्या आमसभेच्या ७६ वे सत्र १४ सप्टेंबरपासून सुरु झाले आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी २५ सप्टेंबरला संबोधन करणार आहे. त्यानिमित्त पंतप्रधान मोदी अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. मंगळवारी ते अमेरिका दौऱ्यासाठी रवाना होतील. यात संयुक्त राष्ट्राच्या आमसभेला संबोधनासह जगातील नेत्यांची भेटही मोदी घेणार आहेत. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेसाठी जगातील जवळपास १०० देशांचे प्रमुख अमेरिकेत उपस्थित असणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत सहभागी होण्याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांची २४ सप्टेंबरला भेट घेणार आहेत. बायडेन राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच अमेरिका दौरा आहे. बायडेन यांची याच दिवशी जपानचे पंतप्रधान सुगा योशीहिदे यांच्यासोबत भेट होणार आहे. तसंच ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांचीही भेट बायडेन घेणार आहेत.

ज्यो बायडेन हे संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत मंगळवारी संबोधित करणार आहेत. त्यावेळी न्यूयॉर्कमध्येच बायडेन मॉरिसन यांची भेट घेतील. त्यानतंर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्स यांची मंगळवारी बायडेन यांच्यासोबत बैठक आहे. पंतप्रधान मोदी अमेरिकेत २४ सप्टेंबर रोजी बायडेन यांची भेट घेण्याआधी २३ सप्टेंबरला उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांची भेट घेणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Uninon Kolhapur News : ‘गोकुळ’ उभारण्यासाठी आनंदराव पाटील चुयेकरांनी घरातील सोनेही गहाण ठेवलं; शशिकांत चुयेकर भावुक

Samruddhi Sugar Factory: ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा! समृद्धी कारखाना देणार प्रतिटन ३०० रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान

Viral Story : ९५ हजार पगाराची नोकरी गेली, घरच्यांचं वागणंच बदललं; म्हणाले- तुला जन्म देऊन चूक झाली, २२ वर्षीय तरुणाने पोस्टद्वारे मांडली व्यथा

Dairy Farmers: दूध उत्पादकांचे अर्थकारण कोलमडले; पशुखाद्याच्या दरात चार महिन्यांत २५ ते ३५ टक्के वाढ, दुधाच्या दराचा ताळमेळ बसेना

Maharashtra Live News : ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील निवडणूक मोदी शाहांनी आपल्यावर घेतली : आशुतोष रांका

SCROLL FOR NEXT