kashi vishwanath dham google
देश

पंतप्रधान मोदी आज करणार काशी विश्वनाथ धामचे उद्घाटन

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज वाराणसी इथे श्री काशी विश्वनाथ धामचे उदघाटन (Kashi Vishwanath Corridor Inauguration) करणार आहेत. श्री काशी विश्वनाथ मंदिराला गंगा नदीच्या सर्व किनाऱ्यांशी जोडण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न या प्रकल्पामुळे प्रत्यक्षात साकार होत आहे. यावेळी १२ राज्यांचे मुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार आहेत.

पंतप्रधान मोदी सोमवारी सकाळी वाराणसी विमानतळावर पोहोचतील आणि त्यानंतर हेलिकॉप्टरने संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठाच्या परिसरात जातील. त्यानंतर ते काल भैरव मंदिराकडे प्रस्तान करतील आणि नंतर कॉरिडॉरला लागून असलेल्या घाटावर जलमार्गाने जातील. पंतप्रधान मोदी घाटातून काशी विश्वनाथ धाम येथे पोहोचतील आणि त्यानंतर कॉरिडॉरचे उद्घाटन करतील. त्यानंतर नवीन कॉरिडॉरच्या आवारात फेरफटका मारून उभारलेल्या इमारतींची पाहणी करतील. हा कार्यक्रम सुमारे दोन-तीन तास चालणार आहे.

पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी नव्याने बांधण्यात आलेल्या काशी कॉरिडॉरला रुद्राक्ष, बाईल, पारिजात, आवळा, अशोक वृक्षांनी सुशोभित केले जाणार आहे. मंदिर परिसर आणि मंदिर चौकात झाडे लावण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. विविध धार्मिक कार्यक्रमांसाठी आणि सुविधांसाठी विविध इमारती बांधण्यात आल्या आहेत. विश्वनाथ धाममध्ये तीन प्रवासी सुविधा केंद्रे उभारण्यात आली आहेत. तसेच भक्तांसाठी लॉकर, तिकीट काउंटर, पूजा साहित्य विक्रीची दुकाने आदी सुविधा उपलब्ध असतील.

१२ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची उपस्थिती -

वाराणसी येथे सोमवारपासून 12 भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री दोन दिवसीय परिषदेला उपस्थित राहतील. आसाम, अरुणाचल प्रदेश, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या आणि बिहार आणि नागालँडच्या उपमुख्यमंत्र्यांचा सहभाग असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT