PM Modi Tejas eSakal
देश

PM Modi Tejas : अन् आत्मविश्वास वाढला.. मोदी बनले तेजस फायटर प्लेनचे पायलट; सांगितला थरारक अनुभव

पंतप्रधान मोदींनी आज बंगळुरूमधील हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडच्या फॅसिलिटीला (HAL) भेट दिली.

Sudesh

PM Modi in Tejas Jet : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज तेजस फायटर प्लेन चालवण्याचा अनुभव घेतला. आपल्या एक्स (ट्विटर) हँडलवरुन फोटो शेअर करत पंतप्रधानांनी याबाबत माहिती दिली. या अनुभवामुळे आपला देशाच्या क्षमतेवरील विश्वास वाढला आहे. आपण खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर आहोत, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदींनी आज बंगळुरूमधील हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडच्या फॅसिलिटीला (HAL) भेट दिली. यावेळी त्यांनी तेजस जेट विमानाच्या निर्मिती कारखान्याची पाहणी केली. सोबतच त्यांनी तेजस विमानामध्ये भरारी देखील घेतली.

तेजस हे सिंगल सीटर जेट विमान आहे. मात्र पंतप्रधान मोदींनी ट्विन-सीटर तेजस विमानाची सफर केली. यामध्ये पंतप्रधान मोदी मागे बसले होते. या ट्विन सीटर व्हेरियंटचा उपयोग ट्रेनिंगसाठी केला जातो.

कसं आहे तेजस?

तेजस हे भारतीय बनावटीचं एक लाईट-कॉम्बॅट एअरक्राफ्ट आहे. हे कोणत्याही हवामानामध्ये यशस्वी उड्डाण भरू शकतं. याला LiFT म्हणजेच लीड-इन फायटर ट्रेनर असंही म्हटलं जातं. भारतीय वायुसेनेने HAL ला 123 तेजस विमानांची ऑर्डर दिली आहे. यातील 26 तेजस मार्क-1 आतापर्यंत डिलिव्हर करण्यात आले आहेत. HAL आता याचं अपग्रेडेड व्हर्जन देखील बनवत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indapur Politics : इंदापुरात पुन्हा पाटील-गारटकर जवळ; नव्या राजकीय समीकरणांची चर्चा, हर्षवर्धन पाटील भाकरी फिरवणार?

Horoscope: तोंडावर साखरेसारखे गोड, पण माघारी करतात मोठा विश्वासघात! ‘या’ राशींच्या व्यक्तींचा असतो कपटी स्वभाव

Duleep Trophy Final : इशान किशनची फिफ्टी अन् प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये विक्रमी कामगिरी; तिलक वर्माच्या संघावर दडपण

Marathi News Live Updates : मराठा आंदोलकांनी भाजप आमदाराला अडवलं, नेमकं काय घडलं?

Delhi Building Collapse : दिल्लीत पाच मजली इमारत कोसळली, ५० विद्यार्थी ढिगाऱ्याखाली, बचावकार्य सुरु...

SCROLL FOR NEXT