देश

मध्यरात्री PM मोदींनी केली वाराणसी रेल्वे स्टेशनची पाहणी

सकाळ डिजिटल टीम

वाराणसीतील कार्यक्रमानंतर पंतप्रधान मोदींनी मध्यरात्री वाराणसी रेल्वे स्टेशनवरील काम पाहिले.

वाराणसी - पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे उत्तर प्रदेश दौऱ्यावर असून सोमवारी त्यांनी काशी विश्वनाथ कॉरीडॉरचे (Kashi Vishwanath Corridor) लोकार्पण केले. त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) हेसुद्धा उपस्थित होते. सकाळी लोकार्पणाचा कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी गंगा नदीत स्नानही केले. तसंच रात्री घाटावर गंगा आरती पंतप्रधान मोदींनी केली.

वाराणसी हा मोदींचा मतदारसंघ असून इथल्या विकास कामांचा आढावासुद्धा त्यांनी घेतला. याचे काही फोटो मोदींनी ट्विटरवर शेअर केले आहेत. मोदींनी ट्विटरवर म्हटले की, पवित्र अशा शहरात शक्य तेवढं सर्वोत्तम इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याचे आमचे प्रयत्न आहेत.

वाराणसीतील (Varanasi) कार्यक्रमानंतर पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) मध्यरात्री वाराणसी रेल्वे स्टेशनवरील काम पाहिले. यावेळीही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) मोदींसोबत होते. रेल्वेस्टेशनवरील विकास कामांचा आढावा मोदींनी यावेळी घेतला. रेल्वेस्टेशनवरील फोटोही मोदींनी शेअर केले आहेत. त्यांनी म्हटलं की, पुढचा स्टॉप वाराणसी स्टेशन. स्वच्छ, अद्ययावत आणि प्रवाशांसाठी सोयीचं ठरेल असं रेल्वे स्टेशन उभारण्यासाठी आम्ही काम करत आहे.

पंतप्रधान मोदी रात्री उशिरा १ वाजता वाराणसी रेल्वे स्टेशनवर पोहोचले होते. गदौलिया चौक दशाश्वमेध रस्ता गुलाबी रंगात न्हाऊन निघाला होता. हा रस्ता पाहण्यासाठी मोदी पोहोचले होते. वाराणसी रेल्वे स्टेशनवर मोदींनी तिथल्या सफाई कर्मचारी आणि स्थानिकांशी त्यांनी संवाद साधला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs DC मॅचमध्ये राडा! मैदानात खेळाडूंमध्ये बाचाबाची अन् स्टँड्समध्ये चाहत्यांची तुफान हाणामारी; Video Viral

Unseasonal Rain : उरुळी कांचनसह परिसराला गारांसह अवकाळी पावसाने झोडपले; विद्युत खांब, झाडांची पडझड, गहू व कांदा पिकाचे मोठे नुकसान

Latest Marathi News Live Update : जैन मुनि नयपद सागर यांच्या ताराराणींबाबतच्या वक्तव्यावरून वाद वाढला

सगळे दिसले पण हनुमान कुठेय? 'रामायण' टीझरमध्ये हनुमान न दिसल्याने प्रेक्षक चकीत; हे आहे कारण

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

SCROLL FOR NEXT