Narendra-Modi1 
देश

तरुणांनो, नवे स्कील आत्मसात करा, हीच काळाची गरज : पंतप्रधान मोदी

कृपादान आवळे

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या संकटात नोकऱ्यांचे स्वरूप बदलत आहे. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केले. ते म्हणाले, तरुणांनी प्रत्येक दिवशी नवे स्कील (कौशल्य) शिकणे गरजेचे आहे. आजच्या काळात स्कील, रि-स्कील आणि अपस्कील असणे गरजेचे आहे. त्यानुसार, आपल्याला बदलणे गरजेचे आहे. हीच आता काळाची गरज आहे. 

जागतिक युवक कौशल्य दिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी देशातील तरूणांना संबोधित केले. पंतप्रधान मोदी म्हणाले, की आजचा दिवस 21 व्या शतकातील तरुणांना समर्पित आहे. आजच्या युगात स्कील सर्वात मोठी ताकद आहे. बदल्यात युगात स्कीलही बदलले आहे. आज आपल्या देशातील तरुण अनेक नवनव्या गोष्टी शिकत आहेत आत्मसात करत आहेत. ही छोटी-छोटी स्कील आत्मनिर्भर भारताची शक्ती बनेल. 

पंतप्रधान मोदी यांच्या भाषणातील ठळक मुद्दे :

पंतप्रधान मोदींनी सांगितले, की कोरोना संकटात लोक विचारत आहेत, की आजच्या या युगात पुढे कसे जाता येईल, त्याचा मंत्र आहे, आपल्याला स्कील मजबूत बनविणे गरजेचे आहे. आता आपल्याला नव्या गोष्टी शिकणे गरजेचे आहे. 

यशस्वी व्यक्तीला आपले स्कील सुधारण्याची संधी शिकायला हवी. नव्या स्कीलनुसार बदल आत्मसात करणे गरजेचे आहे. ही आता काळाची गरज आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्कील आत्मसात केले तर जीवनात उत्साह निर्माण होईल. कोणीही कोणत्या वयात स्कील शिकू शकतो. कोणामध्येही आपली एकप्रकारची क्षमता असते. जे दुसऱ्यांपेक्षा वेगळे आपल्याला बनवते. 

मोदी पुढे म्हणाले, जर तुम्ही व्हिडिओ पाहून सायकल चालवण्याचा प्रयत्न कराल तर त्याचे फक्त ज्ञानच तुम्हाला मिळेल. पण प्रत्यक्षात तुम्हाला सायकल चालवायची असेल तर तुमच्याकडे स्कील असणे गरजेचे आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indapur Politics : इंदापुरात पुन्हा पाटील-गारटकर जवळ; नव्या राजकीय समीकरणांची चर्चा, हर्षवर्धन पाटील भाकरी फिरवणार?

Horoscope: तोंडावर साखरेसारखे गोड, पण माघारी करतात मोठा विश्वासघात! ‘या’ राशींच्या व्यक्तींचा असतो कपटी स्वभाव

Duleep Trophy Final : इशान किशनची फिफ्टी अन् प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये विक्रमी कामगिरी; तिलक वर्माच्या संघावर दडपण

Marathi News Live Updates : मराठा आंदोलकांनी भाजप आमदाराला अडवलं, नेमकं काय घडलं?

Delhi Building Collapse : दिल्लीत पाच मजली इमारत कोसळली, ५० विद्यार्थी ढिगाऱ्याखाली, बचावकार्य सुरु...

SCROLL FOR NEXT