PM Narendra Modi Team eSakal
देश

छत्रपती शिवाजी महाराजांना काशीमधून प्रेरणा मिळाली होती - PM मोदी

अहिल्याबाई होळकरांना देखील त्यांनी वंदन केलं.

सुधीर काकडे

सगळ्या देशाचं लक्ष आज वाराणसीकडे (Varanasi) आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) हे आज काशी विश्वेश्वर मंदीराचा जीर्णोधार करण्यासाठी वाराणसीमध्ये आहेत. गंगा स्नान आणि गंगा पुजन करून पंतप्रधान मोदींनी उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा परिसर म्हणजे फक्त धार्मिक तीर्थस्थळ नसून, इथे आपल्या इतिहासाचं दर्शन होतं असं सांगितलं. यावेळी पंतप्रधान मोदींनी मंदिरात केलेल्या कामांची माहिती दिली.

पंतप्रधान मोदींनी यावेळी काशी विश्वेश्वर मंदीराचं काम करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. तसेच यावेळी त्यांनी काशी, वाराणसी आणि बनारस या शहरांबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते राणी लक्ष्मीबाई आणि चंद्रशेखर आझाद यांच्यापर्यंत सर्वांना काशीने प्रेरणा दिल्याचं त्यांनी सांगिलं. तसेच अहिल्याबाई होळकर यांनी मंदीराचा जीर्णोधार केल्याचं सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी संबंध देशातील वेगवेळ्या राज्याचं, तिथल्या इतिहासाचं काशी सोबत असलेलं नातं यावेळी सांगितलं.

दरम्यान, श्री काशी विश्वनाथ मंदिराला गंगा नदीच्या सर्व किनाऱ्यांशी जोडण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न या प्रकल्पामुळे प्रत्यक्षात साकार होत आहे. यावेळी १२ राज्यांचे मुख्यमंत्री देखील उपस्थित आहेत. पंतप्रधानांनी या कार्यक्रमात देखील एक नवा संकल्प करण्याचं आवाहन केलं. "मला तुमच्याकडून तीन संकल्प हवे आहेत, तुमच्यासाठी नाही तर आपल्या देशासाठी. ते संकल्प म्हणजे स्वच्छता, निर्मिती, नावीन्य हे तीन संकल्प आणि आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी सतत प्रयत्न करा" असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Crime : महाविद्यालयीन तरुणांच्या टोळक्याचा कोल्हापुरात उन्माद २५ हून अधिक वाहने फोडली; तलवारी, एडके घेऊन केली दहशत

CM Gram Sadak Yojana: मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय! ग्रामीण रस्त्यांसाठी ६,४२९ कोटींचा निधी; मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी

Monsoon Update : मान्सून पुन्हा लांबणीवर...महाराष्ट्रात नेमका कधी दाखल होणार? मॉन्सूनची प्रगती का रखडली? जाणून घ्या

Farmer Loan Waiver: कर्जमाफीवर शिक्कामोर्तब! ५५ लाख शेतकऱ्यांना ३६,५८५ कोटींचा मिळणार लाभ; मात्र काय आहेत योजनेचे प्रमुख निकष-अटी

खान सर यांच्या कोचिंग सेंटरबाहेर गोळीबार, ८ ते १० राउंड फायर; सुरक्षा रक्षक जखमी, कुणी केला हल्ला?

SCROLL FOR NEXT