देश

जपानचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर, मोदींकडून चंदनाचा 'कृष्णा पंखा' भेट

ओमकार वाबळे

भारताच्या दौऱ्यावर असलेले जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांना पंतप्रधान मोदींनी 'कृष्ण पंखा' गिफ्ट केला आहे. राजस्थानमध्ये बनवलेल्या चंदनाच्या पंख्यात राधा-कृष्णाची प्रतिमा साकारण्यात आली आहे. ही कलाकृती चंदनाच्या लाकडात तयार करण्यात आल्याचे तिचं मूल्य वाढतं. यामध्ये तयार करण्यात आलेल्या खिडक्यांवर भगवान कृष्णाच्या वेगवेगळ्या मुद्रा आहेत.

प्रेम, करुणेचे हे प्रतिक मानलं जातं. जपान आणि भारतामध्ये यंदा ४ हजार २०० कोटींचे विविध व्यवहार झाले आहेत. या करारांच्या संमतीसाठी किशीदा भारताच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी त्यांचं दिल्लीत आगमन झालं.

या गिफ्टचा तपशील देताना संबंधित 'पंखा' पारंपारिक साधनांचा वापर करून तयार केल्याचं सूत्रांनी सांगितलं. वरच्या बाजूला हाताने कोरलेली मोराची आकृती देखील आहे. भारताच्या राष्ट्रीच पक्ष्याचा समावेश या पंख्यात करण्यात आलाय. मोराची सुबक आकृती मृदू आणि सुंदरतेचं प्रतिक आहे. त्याच्या काठावर एक लहान घुंगरू बसवण्यात आलं आहे. पंखा वापरताना त्याचा आवाज होतो. पंख्यावर रेखीव कोरीवकाम केलेल्या चार खिडक्या तयार करण्यात आल्या आहेत.

चंदनाच्या लाकडावर कोरलेल्या या पंख्याचं काम राजस्थानमधील चुरू या ठिकाणच्या कारागीरांनी साकारलंय. यामुळे चंदनाच्या लाकडाची कलाकृती सुंदर आणि मोहक वाटते. ही कलाकृती शुद्ध चंदनापासून बनलेली आहे. हे चंदन प्रामुख्याने भारताच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये सापडतं. पारंपारिक जाळीच्या डिझाइनला भारतीय कलेत वेगळं स्थान आहे. राजस्थानातील अनेक राजपूत घरातील भांड्यावर आणि लाकडी पंख्यांवर अशा पद्धतीची कलाकृती तयार करण्यात आली होती. चंदन हे त्याच्या विशिष्ट सुगंधासाठी ओळखलं जातं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Heavy Rain Alert : मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार ! महाराष्ट्रासह १७ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Tamil Nadu Politics: तमिळनाडूत मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा; अण्णा द्रमुकचे १० आमदार ‘टीव्हीके’च्या संपर्कात, १५ ऑगस्टपूर्वी पक्षांतराची शक्यता

Latest Marathi News Live Update : थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये भीषण दुर्घटना; पबला लागलेल्या आगीत 27 जणांचा होरपळून मृत्यू, अनेकजण जखमी

Police Constable Death : चंदगड पोलिस ठाण्यात खळबळ! ड्युटी संपवून घरी परतलेल्या 32 वर्षीय तरुण पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू; 3 वर्षांची चिमुरडी पोरकी

Akola: बोगस बियाणे प्रकरणी कंपन्यांना दणका; दोन कंपन्यांवर गुन्हे दाखल; कृषी विभागाची कारवाई

SCROLL FOR NEXT