देश

कोरोना गेल्या 100 वर्षातील सर्वात मोठं संकट : पंतप्रधान मोदी

सूरज यादव

देशात लसीकरण मोहिम सुरु असली तरी मोठ्या प्रमाणावर लस वाया जात आहे. त्याबद्दल चिंता व्यक्त करताना मोदी म्हणाले की, कोरोना लस वाया जात असून ते थांबवायला हवं.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) गुरुवारी पुन्हा एकदा कोरोनाच्या (Coronavirus) संदर्भात देशातील वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत (District Collectors) बैठक घेतली. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. यावेळी मोदी म्हणाले की, कोरोनाची साथ ही गेल्या 100 वर्षातील सर्वात मोठी आपत्ती आहे. कोरोनाने तुमच्यासमोर आव्हाने आणखी वाढवली आहेत. तुम्ही जिल्ह्यातील सर्वात मोठे योद्धे आहात आणि गावागावात असा संदेश द्यायचा आहे की गावाला कोरोनामुक्त ठेवायचं आहे. आपल्याला बराच काळ जनजागृती करावी लागणार असल्याचंही मोदी म्हणाले. (pm-narendra-modi-meeting-with-10-states-district-collectors-on-covid-19-situation)

देशात लसीकरण मोहिम सुरु असली तरी मोठ्या प्रमाणावर लस वाया जात आहे. त्याबद्दल चिंता व्यक्त करताना मोदी म्हणाले की, कोरोना लस वाया जात असून ते थांबवायला हवं. एक लस वाया जाणं म्हणजे एका व्यक्तीला ती मिळणार नाही. यामुळे आपण जीवन सुरक्षा कवच देऊ शकणार नाही. म्हणूनच कोरोना लस वाया जाण्यापासून रोखायला हवं.

लहान मुलं आणि तरुणांमध्ये कोरोनाचा धोका असून त्याबाबत बोलाताना मोदींनी म्हटलं की, व्हायरसच्या म्युटेशनमुले तरुण आणि मुलांसाठी चिता व्यक्त केली जात आहे. माझी सर्वांना विनंती आहे की तुम्ही तुमच्या जिल्ह्यात तरुण आणि मुलांमध्ये संसर्गाची आकडेवारी एकत्र करा आणि त्याची समीक्षा करा.

लोकांचे जीव वाचवण्यासह त्यांचे जीवन नॉर्मल करण्यालाही प्राधान्य आहे. गरीबांसाठी मोफत धान्याची सुविधा असेल किंवा आवश्यक पुरवठा असेल. काळाबाजार रोखण्याचंही आव्हान आपल्यासमोर आहे. या सगळ्यात कोरोनाविरोधातील लढा जिंकायचा आहे आणि पुढे जाणंही गरजेचं असल्याचं मोदींनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT