PM Modi Ram Setu Visit  
देश

PM Modi Ram Setu Visit: प्रभू रामाने जिथे ‘राम सेतू’ बांधला तिथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार पूजा

PM Modi Ram Setu Visit: अयोध्येतील राममंदिरात रामलल्लाच्या अभिषेकाची तयारी जोरात सुरू आहे. 22 जानेवारीसाठी सुरक्षा कर्मचारी देखील तैनात आहेत. सुरक्षा कर्मचार्‍यांसोबतच एनएसजी आणि एसपीजीनेही कमांड हाती घेतली आहे.

Sandip Kapde

PM Modi Ram Setu Visit: अयोध्येतील राममंदिरात रामलल्लाच्या अभिषेकाची तयारी जोरात सुरू आहे. 22 जानेवारीसाठी सुरक्षा कर्मचारी देखील तैनात आहेत. सुरक्षा कर्मचार्‍यांसोबतच एनएसजी आणि एसपीजीनेही कमांड हाती घेतली आहे. आता रामलल्लाची प्रतिष्ठापणा होण्यासाठी काही तास उरले आहे. दरम्यान, अयोध्येतील रामलल्लाच्या अभिषेक सोहळ्याच्या एक दिवस आधी म्हणजे आज (रविवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ज्या ठिकाणी राम सेतू बांधला होता त्या ठिकाणी भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदी अरिचल मुनई पॉइंटला भेट देणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तामिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत. रविवारी नरेंद्र मोदी राम सेतू बांधणीच्या ठिकाणी पोहोचतील, त्यानंतर ते श्री कोठंडाराम स्वामी मंदिरात पूजा आणि दर्शन घेतील. ही दोन्ही ठिकाणे तामिळनाडूच्या धनुषकोडी जिल्ह्यात आहेत. येथेच लंकेचा शासक रावणाचा धाकटा भाऊ बिभीषण याला भगवान राम पहिल्यांदा भेटले.

आज या ठिकाणी श्री कोठंडाराम स्वामी मंदिर आहे. ज्या ठिकाणाहून रामसेतूचे बांधकाम सुरू झाले त्याला अरिचल मुनई पॉइंट असे म्हणतात. पीएम मोदी अरिचल मुनई पॉइंटलाही भेट देणार आहेत. पीएम मोदी सकाळी 9.30 वाजता येथे पोहोचतील. यानंतर सकाळी 10.15 वाजता ते श्री कोठंडाराम स्वामी मंदिरात पूजा व दर्शन घेतील. कोठंडाराम नावाचा अर्थ धनुष्य असलेला राम.

जागेचे महत्त्व काय?

धनुषकोडी बद्दल असे म्हटले जाते की येथेच विभीषणाने श्रीरामांची पहिल्यांदा भेट घेतली आणि त्यांच्याकडे आश्रय घेतला. काही आख्यायिका असेही म्हणतात की हे ते ठिकाण आहे जेथे श्रीरामांनी विभीषणाचा राज्याभिषेक केला होता. (Latest Marathi News)

शनिवारी (20 जानेवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भगवान रामनाथस्वामी मंदिरात प्रार्थना केली. असे म्हटले जाते की तामिळनाडूच्या रामनाथपुरम जिल्ह्यातील रामेश्वरम बेटावर असलेल्या शिव मंदिराचा रामायणाशी संबंध आहे, कारण या ठिकाणी असलेल्या शिवलिंगाची स्थापना भगवान श्री रामाने केली होती. यानंतर श्रीरामांनी माता सितेसोबत प्रार्थना केली होती. रंगनाथनस्वामी मंदिराला भेट देणारे पंतप्रधान मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET UG Paper Leak: ज्याला मानलं जात होतं पेपरफुटीचा 'मुख्य सूत्रधार', त्यालाच CBI ची क्लीन चिट; चार्जशीटमध्ये नेमकं काय?

Education Ministry latest news : मोठी घडामोड! विनीत जोशींची उच्च शिक्षण विभागाच्या सचिवपदावरून हकालपट्टी

Latest Marathi News Live Update : 'तावडे हॉटेल' अतिक्रमणाची सुनावणी पुन्हा लांबणीवर; पुढील सुनावणी २७ ऑगस्टला होणार

Nagpur High Court: महिनाभरात सर्व प्रकरणांची उत्तरे देऊ; उच्च न्यायालयात नगरविकास विभागाची ग्वाही

Nagpur Farmers Protest: संतापलेल्या शेतकऱ्यांकडून रस्त्यावरच धान रोवणी ; ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेच्या भोंगळ कारभाराचा नोंदवला निषेध

SCROLL FOR NEXT