pm modi esakal
देश

पंतप्रधान मोदींसमोर आज भाजप मुख्यमंत्र्यांची परीक्षा!

सकाळ डिजिटल टीम

वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (pm narendra modi) काशी दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. पंतप्रधानांनी कालच्या व्यस्त दिवसानंतरही मध्यरात्रीपर्यंत ते वाराणसीच्या (varanasi) कामांचा आढावा घेत आहेत. दरम्यान पंतप्रधान मोदी हे भाजपच्या मुख्यमंत्र्यांची (bjp cm) आज बैठक घेणार आहे.

मुख्यमंत्र्यांची मोदींसमोर कसोटी

राज्यात सुरु असलेल्या वेगवेगळ्या मोठ्या योजनांवर प्रत्येक मुख्यमंत्र्याला मोदींसमोर सादरीकरण करायचे आहे. त्यावर मोदींनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरही द्यावं लागेल. गेल्या काही काळात कर्नाटक, आसाम, उत्तराखंड अशा राज्यात भाजपनं खांदेपालट केलाय. तिथं मुख्यमंत्रीपदी असलेले नेते नवे आहेत. त्यामुळेच ते काय करतायत, कुठल्या योजना राबवत आहेत. त्याचा हिशेब देण्याघेण्याचं काम बैठकीत होणार आहे.

काशी दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस

मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्यासोबत त्यांनी काशी विश्वनाथ मंदिराचा आधी दौरा केला तर मध्यरात्रीनंतर त्यांनी वाराणसीच्या रेल्वे स्टेशनची पाहणी केली. स्टेशनच्या बाहेर असलेल्यांसोबतही चर्चा केली. त्याचे फोटोज पंतप्रधानांनी ट्विटरवर शेअर केलेत. त्यामुळे मध्यरात्री उशिरापर्यंत जागे असतानाही मोदींच्या आजच्या कार्यक्रमात काहीही बदल केलेला नाही. दुपारी 4 नंतर ते दिल्लीकडे रवाना होतील.

मुख्यमंत्र्यांच्या परिषदेत सहभागी

आज दुपारी 3:30 वाजता, पंतप्रधान वाराणसीतील स्वरवेद महामंदिर येथे सदगुरु सदाफलदेव विहंगम योग संस्थानच्या 98 व्या वर्धापन दिन सोहळ्याला उपस्थित राहतील. दोन दिवसांच्या दौऱ्यात पंतप्रधान आसाम, अरुणाचल प्रदेश, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या आणि बिहार आणि नागालँडच्या मुख्यमंत्र्यांचा सहभाग असलेल्या परिषदेत सहभागी होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT