modi 
देश

Loksabha 2019: नंतर पश्चाताप करण्यापेक्षा मतदान करा - नरेंद्र मोदी

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - निवडणूकांचे वातावरण सध्या तापू लागले आहे. मतदानासाठीच्या तारखा जाहीर झाल्या असून, त्याला आता एका महिन्यापेक्षा कमी दिवस राहिले आहेत. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना मतदार यादीत आपले नाव आहे की नाही हे तपासण्याचे आवाहन केले आहे.असे आवाहन करताना मोदिंनी ब्लॉगच्या माध्यमातून देशाच्या विकासासाठी एक मत महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे. तसेच मतदानाचा हक्क बजावण्यासाठीही जनेतेला त्यांनी आवाहन केले आहे. 

नरेंद्र मोदींनी यांच्या ब्लॉगमध्ये त्यांनी, यामध्ये मतदार यादीत नाव नोंदणी, आपले नाव मतदार यादीत आहे की नाही याची खात्री, मतदानादिवशी इतर कोणताही प्लॅन न करणे आणि इतरांनाही मतदान करण्यासाठी प्रत्साहन देणे या महत्त्वाच्या बाबी लक्षात घेण्याचे आवहन मतदारांना केले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी महिन्याभरापेक्षाही कमी काळ राहिला आहे. मतदान आपल्या महत्त्वाच्या कर्तव्यांपैकी एक अशी आठवणदी त्यांनी ब्लॉगच्या माध्यातून करुन दिली आहे. 

पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांसाठी तर हा सेलिब्रेशनचा दिवस असला पाहिजे. असे सांगतानाच मोदींनी मतदानासाठी सकारात्मक वातावरण तयार करण्यासाठी प्रयत्न करायला हवे असे म्हटले आहे. मतदानपत्र मिळणे आणि मतदान करणे गर्वाची सर्वांना गोष्ट वाटावी अशी वातावरण निर्मिती व्हावी असेही ते म्हणाले आहेत. 

मतदान न करणाऱ्या व्यक्तिला या गोष्टीचा पश्चाताप झाला पाहिजे.. असे वातावरण देशात असेल तर एखादी चूकीची गोष्ट समोर आल्यावर मतदान न करणारी व्यक्ती यासाठी स्वत:ला जबाबदार ठरवेल. आपण मतदान केले असते तर अशी वाईट परिस्थती आज नसती असा विचार त्याच्या मनात आला पाहिजे, असेही मोंदींनी म्हटले आहे. 

ट्विटरवर ब्लॉग पोस्ट करताना नरेंद्र मोदींनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, शरद पवार, मायावती यांच्यासह अनेक दिग्गज, तरुण नेते, अभिनेते यांना टॅग करत लोकांना मतदान करण्यासाठी प्रेरित करण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs RCB: रोहित शर्माने IPL मध्ये मोठा विक्रम रचला, पण आऊट न होताही अचानक का सोडलं मैदान? मुंबई इंडियन्सने सांगितलं कारण

दुसरी, तिसरी, चौथीचा बदलणार अभ्यासक्रम! नवीन अभ्यासक्रमासाठी ४ मेपासून शिक्षकांचे प्रशिक्षण, ३० मेपर्यंत तीन टप्प्यात शिक्षकांचे प्रशिक्षण, वाचा...

Pune Crime : शरद मोहोळ खून प्रकरणात वकील आरोपीचा जामीन फेटाळला

Pune Velhe News: गुंजवणी धरणात दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू; पंप टाकताना घडली दुर्दैवी दुर्घटना, गावात शोककळा

Nagpur IPL betting raid: आयपीएल ऑनलाइन क्रिकेट सट्टा रॅकेटचा पर्दाफाश; नागपुरात छापा, चौघांना अटक, ३.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT