देश

पंजाब मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर आपचं आंदोलन; पोलिसांनी केला पाण्याचा मारा

विनायक होगाडे

चंदीगढ : पंजाबमध्ये सध्या वीजेचं संकट तीव्र झालं आहे. आता यासंदर्भात राजकारण देखील तापलेलं आहे. शुक्रवारी शिरोमणी अकाली दल आणि बसपा युतीने आंदोलन केलं होतं. तर आज शनिवारी आम आदमी पार्टीने सिसवानमध्ये मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्या फार्महाऊसला घेराव घालून आंदोलन केलं आहे. पोलिसांनी या आंदोलकांना रोखण्यासाठी बॅरिकेडींग केलं होतं. मात्र, कार्यकर्त्यांनी हे बॅरिकेड्स देखील तोडले आहेत.

यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर पाण्याच्या तीव्र फवाऱ्याचा मारा केला. यावेळी आम आदमी पक्षाचे पंजाबचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार भगवंत मान यांनी म्हटलंय की, पंजाबमध्ये लोक धरणे आंदोलन करत आहेत आणि केवळ एक व्यक्ती आपल्या घरी बसून आनंद घेत आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांच्या फार्म हाऊसचा मीटर चेक करण्यासाठी आलो आहेत जेणेकरुन हे समजेल की इथे किती तास वीज कापली जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने वीज मोठ्या कालावधीसाठी जात आहे. यामुळे लोकांना मोठा त्रास सोसावा लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: जरांगेंचं उपोषण सुरु असताना नाशिकमध्ये मराठा समन्वयकांची पत्रकार परिषद; SEBC आरक्षणावर ठाम!

Nagara Road Accident : कामाच्या शोधात निघालेल्या मजुरांवर काळाचा घाला! गोंदिया-बालाघाट मार्गावर ट्रक-पीकअपच्या धडकेत 6 जण ठार, 3 वर्षीय बालकाचाही समावेश; 7 गंभीर

२८ चेंडूंत १३६ धावा! Mumbai Indians च्या फलंदाजाची हवा; १७३ धावांच्या वादळी खेळीने वेधले जगाचे लक्ष, IPL 2027 गाजवण्यासाठी सज्ज

Marathi News Live Updates : काल केसनंद, आज खराडी... ऐश्वर्या जाधव यांच्या लावणी कार्यक्रमाला पुन्हा परवानगी नाकारली!

मी युनिफॉर्म घालणार नाही.... जेलमध्ये कुणाचंही ऐकत नव्हता संजय दत्त; एका स्त्रीसमोर मात्र झुकला, कोण होती ती?

SCROLL FOR NEXT