पंतप्रधान नरेंद्र मोदी  sakal
देश

आमच्या सरकारमुळे गरीब लक्षाधीश ; पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान मोदी : नव्या संकल्प सिद्धीचा हा काळ

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : ‘‘ गरिबांना सरकार जी घरे देते त्यामुळे ते लक्षाधीश बनतात. आमच्या सरकारने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मागील ७ वर्षांत ३ कोटी लोकांना अशी घरे देऊन लक्षाधीश बनविले आहे.’’ असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केला.

‘आत्मनिर्भर अर्थव्यवस्था’ या विषयावर भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोदी यांनी सांगितले की,‘‘ मागील सात वर्षांत आमच्या निर्णयांमुळे देश फार पुढे गेला आहे. स्वातंत्र्याच्या ‘अमृत’काळात देशासमोर शतकातून एकदाच येणाऱ्या महासाथीचे संकट कोसळले पण देशवासीयांनी हे आव्हान स्वीकारले. ‘कोरोना’नंतरच्या काळात जग सध्यासारखे असणार नाही. मात्र जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन आता बदलला आहे. जग भारताला आता अधिक सशक्त देशाच्या रूपात पाहू इच्छिते. हा काळ नव्या संधींचा तसेच नवीन संकल्पांच्या सिद्धीचा आहे.

मोदी म्हणाले

  • राष्ट्ररक्षेसाठी सीमावर्ती भागांतील गावांचा वेगाने विकास हवा

  • सीमेवरील दुर्गम गावांत सरकार ‘एनसीसी’ शिबिरे भरवेल

  • गरीब, मध्यम वर्गाला मूलभूत सुविधा देण्यावर भर

  • ‘जल जीवन मिशन’वर वेगाने काम सुरू केले आहे

  • केन- बेतवासारख्या प्रकल्पामुळे बुंदेलखंडचे चित्र बदलेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोनम वांगचुक यांचं वजन ९ किलो घटलं, उपोषणाचे अवयवांवर गंभीर परिणाम; प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिला इशारा

Pandharpur VIP Darshan : पहिल्याच दिवशी VIP दर्शन बंदीचा फज्जा! मुनगंटीवारांना ठेवलं वेटिंगवर, गुलाबराव पाटलांना दिलं तात्काळ दर्शन; महायुतीच्या नेत्यांमध्येच दुजाभाव?

Latest Marathi News Live Update : पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिरात व्हीआयपी दर्शन घेतल्यास गुन्हा दाखल करणार

डॉक्टर पतीला संपवलं, ८ वर्षांचा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात; शेजारी डॉक्टर पत्नी मोबाईल बघत बसलेली

'आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला' उर्मिला आणि आदिनाथ कोठारे यांचा घटस्फोट, पोस्ट शेअर करत म्हणाले...

SCROLL FOR NEXT