देश

Post Godhra Riots: "पोलिसांनी हिंदूंना गोवलं"; गुजरात कोर्टानं केली 35 आरोपींचा मुक्तता

ढोंगी धर्मनिरपेक्ष मीडिया आणि राजकारण्यांनी जाणीवपूर्वक हिंदुंना गोवलं असल्याचं कोर्टानं म्हटलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

अहमदाबाद : सन २००२ मध्ये गोध्रा दंगलीनंतर झालेल्या हिंसाचारातील ३५ आरोपींची सुटका गुजरातमधील स्थानिक कोर्टानं केली आहे. हा निकाल देताना कोर्टानं पोलिसांवर, माध्यमांवर तसेच राजकारण्यांवर गंभीर ताशेरे ओढले आहेत. पोलिसांनी जाणीवपूर्वक हिंदूंना या खटल्यांमध्ये अडकवलं असल्याचंही कोर्टानं म्हटलं आहे. (Post Godhra Riots Gujarat Court Acquits 35 Accused Saying Police Implicated Hindus)

गुजरातच्या हालोल कोर्टाचे अतिरिक्त सेशन्स जज हर्ष त्रिवेदी म्हणाले, "स्युडो सेक्युलर मीडिया आणि संघटनांच्या दबावामुळं पोलिसांनी महत्वाच्या हिंदू व्यक्तींना गोध्रा दंगलीनंतर झालेल्या हिंसाचार प्रकरणात गोवलं"

ज्या ओरापींना गोध्रा दंगलीनंतरच्या हिंसाचाराला कारणीभूत ठरवतं अटक करण्यात आली होती, त्यांच्यावर हत्या, बेकायदा एकत्र जमणं तसेच इतर विविध चार प्रकरणामध्ये त्यांच्यावर आरोप आहेत. या हिंसाचारात तीन मुस्लिम व्यक्तींना करोल बस स्टँड, देलोल गाव, डेरोल स्टेशन भागातील हिंसाचार ठार करण्यात आलं होतं. यातील आरोपी सध्या जामिनावर तुरुंगाबाहेर होते.

आरोपींची सुटका करताना कोर्टानं काय म्हटलं?

आरोपींची सुटका करताना न्या. त्रिवेदी यांनी म्हटलं की, "एकूण ५२ आरोपींपैकी १७ आरोपींचा २००२मध्ये ट्रायल सुरु झाल्यापासून आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. पण इतरांची सुटका करण्यात येत आहे. कारण आरोपींविरोधात पुरेसे पुरावे नाहीत. तसेच जप्त केलेली हत्यारं आणि शस्त्र हे आरोपींचेच असल्याचं सिद्ध होत नाही. साक्षीदारांनी यामध्ये माघार घेतली आहे. तसेच पीडित लोक आपल्या जबाबावर ठाम नाहीत" (Latest Marathi News)

"मुस्लिम जमावानं केलेल्या दगडफेकीत दोन्ही समुदायातील सदस्यांच्या मालमत्तेचं नुकसान झालं आणि पोलिस कर्मचारी जखमी झाले. या प्रकरणांचा तपास मुस्लिम समाजाच्या व्यक्तींकडून सतत आणि वारंवार लिखित आरोपांमुळं बराच काळ चालला आणि स्यूडो-सेक्युलर मीडिया आणि राजकारण्यांनी दुःखाच्या जखमेवर मीठ चोळले. त्याचा फटका शांतताप्रिय गुजराती लोकांना बसला. तपास इतका लांबला होता की पहिल्या आणि शेवटच्या साक्षीदाराला बोलावण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला," असं न्या. त्रिवेदी पुढे म्हणाले. (Marathi Tajya Batmya)

गोध्रा दंगल उत्स्फूर्त होती आणि स्यूडो-सेक्युलर व्यक्तीनं दावा केला म्हणून ती नियोजित होऊ शकत नाही, असंही कोर्टानं ठामपणे सांगितलं. व्यक्तीच्या गुणांची पर्वा न करता बहुसंख्यांना दोष दिला जातो, असंही कोर्टानं सुनावणीदरम्यान म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! दसऱ्यानंतर मुंबईत महत्त्वाची बैठक; पगारवाढ आणि DAबाबत काय चर्चा होणार?

VIDEO: दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर; महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

Masur Fox Attack: मसूरमध्ये कोल्ह्यांची दहशत! वृद्धासह चिमुकली, महिला आणि शेतकऱ्यावर हल्ले

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकला आग

SCROLL FOR NEXT