जनधन योजना सकाळ डिजिटल टीम
देश

Jan-Dhan Account : जनधन खातेधारकांकरीता खुश खबर; वाचा योजना

सरकार दर महिन्याला तुमच्या खात्यात इतके हजार रुपये पाठवणार

सकाळ डिजिटल टीम

Jan Dhan Account : केंद्रातील मोदी सरकारने जनधन योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणावर बँकांमध्ये खाती उघडली होती, त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. आता मोदी सरकार जनधन खातेदारांना एका नव्या योजनेचा लाभ देत आहे, त्यामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर हसू उमटणार आहे. जर तुम्ही जनधन योजनेचे खाते उघडले असेल तर ही बातमी तुमच्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही.

दर महिन्याला इतके रुपये खात्यात येणार?

पीएम श्रम योगी मानधन योजनेशी संबंधित लोकांच्या खात्यात दरमहा ३,००० रुपये पेन्शन म्हणून दिले जातील. या योजनेत तुम्हाला फक्त तुमचे आधार कार्ड द्यावे लागेल आणि तुमच्या वृद्धापकाळात तुम्हाला जनधन खात्यातून दरमहा तीन हजार पेन्शन मिळेल. या योजनेअंतर्गत सरकार दरमहा तीन हजार रुपये जनधन खात्यातील लाभार्थ्यांच्या खात्यात हस्तांतरित करते.

पैसे मिळवण्यासाठी काय करावे लागेल ?

पेन्शन मिळवण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम पीएम श्रम योगी मानधन योजनेत नोंदणी करावी लागेल. ही नोंदणी तुम्ही जनधन खात्याच्या ऑनलाइन वेबसाइटवर जाऊन करू शकता. याशिवाय तुमच्या जवळील स्थानिक बँकांमध्येही नोंदणी करून खाते उघडता येते. मात्र हे खाते उघडण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. तुमच्या माहितीसाठी असंघटित क्षेत्रात काम करणारी प्रत्येक व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते. असंघटित क्षेत्रात रस्त्यावर चिल्लर गोष्टीची विकणारे विक्रेते, हेड लोडर, वीटभट्टी कामगार, मोची, कचरा वेचणारे, घरगुती कामगार, धोबी, रिक्षाचालक, भूमिहीन आणि मजूर यांचा समावेश होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

Pune Cyber Crime : लग्नाचे आमिष दाखवून पुण्यात ४३ वर्षीय महिलेला २६ लाखांचा गंडा; येरवड्यात गुन्हा दाखल!

Raj Thackeray: पैसे फेकले की जनता विकत मिळते? ठाकरे बंधूंचा सरकारला थेट सवाल, राज ठाकरे म्हणाले- निवडणूक जिंकण्यासाठी...

SCROLL FOR NEXT