Pramod Sawant  sakal
देश

Pramod Sawant : प्रमोद सावंत यांची पाच वर्षे पूर्ण ; गोव्यात कार्यकाळ पूर्ण करणारे भाजपचे पहिले मुख्यमंत्री

डॉ. प्रमोद सावंत हे भाजपचे मुख्यमंत्रिपदाची सलग पाच वर्षे पूर्ण करणारे पहिले मुख्यमंत्री ठरणार आहेत. विशेष म्हणजे कोणत्याही नेत्याच्या शैलीची छाप स्वतःवर पडू न देण्याची काळजी घेत त्यांनी त्यांचे स्वतंत्र अस्तित्व सिद्ध केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पणजी : डॉ. प्रमोद सावंत हे भाजपचे मुख्यमंत्रिपदाची सलग पाच वर्षे पूर्ण करणारे पहिले मुख्यमंत्री ठरणार आहेत. विशेष म्हणजे कोणत्याही नेत्याच्या शैलीची छाप स्वतःवर पडू न देण्याची काळजी घेत त्यांनी त्यांचे स्वतंत्र अस्तित्व सिद्ध केले आहे.

स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यात त्यांना या पाच वर्षांत यश आले आहे. १९ मार्च २०१९ रोजी त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. भाजपचे नेते आणि गोव्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनाही मुख्यमंत्रिपदाची सलग पाच वर्षे पूर्ण करता आली नव्हती. पर्रीकर यांनी चार वेळा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. डॉ. सावंत यांनी मुख्यमंत्री म्हणून प्रथम शपथ घेतली तेव्हा गोव्यातील परिस्थिती त्यांच्यासाठी प्रतिकूल होती. मात्र त्यांनी संयम दाखवत प्रतिकूल परिस्थिती हाताळली.

सावंत यांनी मुख्यमंत्री म्हणून प्रथम शपथ घेतली तेव्हा परिस्थिती सर्वार्थाने प्रतिकूल होती. मनोहर पर्रीकर हेच राज्याचे मुख्यमंत्री असतील असे गृहित धरून गोव्यातील राजकीय आखणी करण्यात आली होती.

मात्र त्यांच्या निधनाने निर्माण झालेली राजकीय कोंडी फोडण्यासाठी, सावंत यांनी तत्‍कालीन विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांच्यासह १० आमदार आणि महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाच्या दोन आमदारांना मुख्यमंत्र्यांनी भाजपमध्ये प्रवेश देत राजकीय कोंडी फोडली. डॉ. सावंत हे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांना मंत्री म्हणूनही काम करण्याचा अनुभव नव्हता. त्यामुळे त्यांच्याविषयी अनेकांनी साशंकता व्यक्त केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saving Money Tips : बंगळूरसारख्या महागड्या शहरात 22 वर्षांच्या तरुणीचा 18 हजारांत संसार! कसं करते मॅनेज? जाणून घ्या तिचं 'सिक्रेट'

Diabetes Breath Analyzer : आता इंजेक्शनला बाय-बाय! ब्रीथ टेस्टनेच होणार डायबिटीस तपासणी; तज्ज्ञांचा नवा शोध, रुग्णांना मोठा दिलासा

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये महिलांची बाईक रॅली

Who is Malad Fake Baba? मुंबईत भोंदूबाबाचा अघोरी प्रताप! अंगात देवी येते सांगून काढायचा 'भूत'; साहित्याची यादी पाहून तुम्हीही हादरून जाल

पुण्यात टक्केवारीवरून भाजपच्या आजी-माजी नगरसेविकांचा राडा; महापालिकेत शिवीगाळ आणि गोंधळ, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT