prashant-kishor 
देश

प्रशांत किशोर यांची टीम नजरकैदेत; तृणमूल काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल

"पश्चिम बंगालमधील विजयानं भाजपं खवळलाय"

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : राजकीय रणनीतीकार आणि पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार प्रशांत किशोर यांची कंपनी IPACच्या टीमला त्रिपुरा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. येथील एका हॉटेलमध्ये टीमच्या सर्व सदस्यांना ठेवण्यात आलं आहे. यावरुन ममता बॅनर्जी यांचे पुतणे आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी ट्विटकरुन भाजपवर निशाणा साधला आहे. (Prashant Kishor team confined Tripura hotel aau85)

अभिषेक बॅनर्जी यांनी ट्विट करत म्हटलं की, "तृणमूल काँग्रेससाठी त्रिपुराला गेलेल्या प्रशांत किशोर यांच्या टीमला तिथल्या भाजप सरकारनं ताब्यात घेतलं आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या विजयामुळं भाजप खवळला आहे."

दरम्यान, त्रिपुरा पोलिसांनी याचा इन्कार केला असून हे खोटं वृत्त असल्याचं म्हटलं आहे. किशोर यांच्या टीमकडे केवळ चौकशी केली जात आहे, त्यांना ताब्यात घेतलेलं नाही, असं पोलिसांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palkhi Route Development : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामाला गती

Pune Traffic: वडगाव घेनंद घाटात अवजड वाहन बंद; भर पावसात पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

Tomato Rate : नारायणगावात टोमॅटोच्या भावात घसरण; उपबाजारात हंगामातील उच्चांकी ६० हजार टोमॅटो क्रेटची आवक

CET Exam Result : सीईटी परीक्षेत बारामतीचा डंका, दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT