Congress confused about Prashant Kishor sakal
देश

प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत अनिश्‍चितता!

निवडणूक व्यूहरचनाकार प्रशांत किशोर यांच्या काँग्रेसमध्ये समावेशाबद्दलची अनिश्चितता कायम आहे.

सकाळ वृत्तसेवा

दिल्ली : निवडणूक व्यूहरचनाकार प्रशांत किशोर यांच्या काँग्रेसमध्ये समावेशाबद्दलची अनिश्चितता कायम आहे. आगामी विधानसभा निवडणुका व लोकसभेच्या तयारीसाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी विशेषाधिकारप्राप्त कृती गट नेमण्याची घोषणा केली आहे. या गटातील सदस्यांची नावे जाहीर झाल्यानंतर प्रशांत किशोर यांची नेमकी भूमिका समोर येईल, असे स्पष्ट संकेत काँग्रेसतर्फे आज देण्यात आले.

दरम्यान, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंतच्या निर्णय प्रक्रियेसाठी विशेषाधिकारप्राप्त कृती गट नियुक्त केल्यानंतर नवे अध्यक्ष काय करतील, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. काँग्रेसची स्थिती सुधारण्यासाठी निवडणूक व्यूहरचनाकार प्रशांत किशोर यांनी सोनिया गांधींसमवेत चर्चा केली होती. यानंतर त्यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या. प्रशांत किशोर यांच्या सूचनांवर विचारमंथनासाठी सोनिया गांधींनी पी. चिदंबरम, अंबिका सोनी, प्रियांका गांधी-वाड्रा, दिग्विजयसिंह, जयराम रमेश, मुकुल वासनिक, के. सी. वेणुगोपाल आणि रणदीप सुरजेवाला यांची समिती नेमली. या समितीने मागील आठवड्यात बैठका घेऊन या सूचनांचे अध्ययन करून त्याबाबतचा अहवाल सादर केला होता. त्याआधारे पक्षाध्यक्षा सोनिया गांधींनी पक्षासमोरील आव्हानांना तोंड देण्यासाठी विशेषाधिकार कृती गट २०२४ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, मुख्यप्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी प्रशांत किशोर यांच्या प्रवेशाबाबत बोलण्याचे टाळले. कृती गटाची नियुक्ती झाल्यानंतर सदस्य कोण असतील आणि त्यांची भूमिका काय असेल, हे सांगितले जाईल असे संदिग्ध उत्तर दिले.

दोन मतप्रवाह

प्रशांत किशोर यांच्यावरून काँग्रेसमध्ये दोन परस्पर विरोधी मतप्रवाह असल्याचे समजते. प्रशांत किशोर यांना एवढे महत्त्व देण्याची गरज काय असा एका गटाचा थेट सवाल आहे. एकीकडे काँग्रेसशी चर्चा सुरू असताना त्यांच्या ‘आयपॅक’ ने तेलंगण राष्ट्र समिती पक्षाशी केलेल्या कराराकडेही या गटाने लक्ष वेधले आहे. तर, सध्याच्या ‘डेटा केंद्रीत’ निवडणुकीच्या रचनेत प्रशांत किशोर यांच्या क्षमतेचा उपयोग करावा असे दुसऱ्या गटाचे म्हणणे आहे. चिंतन शिबिरात प्रशांत किशोर सहभागी होणार की नाही यावरून अटकळबाजी सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT