Crime sakal
देश

Madhya Pradesh Crime : मध्य प्रदेशात गर्भवतीला बलात्कारानंतर पेटविले

चौतीस वर्षीय गर्भवतीवर तिघांनी बलात्कार करून तिला पेटविल्याची धक्कादायक घटना मोरेना जिल्ह्यात घडली.

सकाळ वृत्तसेवा

मोरेना (मध्य प्रदेश) - चौतीस वर्षीय गर्भवतीवर तिघांनी बलात्कार करून तिला पेटविल्याची धक्कादायक घटना मोरेना जिल्ह्यात घडली. या घटनेत महिला सुमारे ८० टक्के भाजली असून तिच्यावर ग्वाल्हेरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची मृत्युशी झुंज सुरू आहे.

मध्य प्रदेश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या पतीवर दुसऱ्या महिलेने बलात्काराचा आरोप केला होता. या प्रकरणी पीडितेच्या पतीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता. सध्या तो जामिनावर आहे. या प्रकरणात तडजोड करण्यासाठी ती या महिलेच्या गावी गेली होती.

त्यावेळी, दुसऱ्या महिलेच्या घरात आधीपासूनच उपस्थित असलेल्या तीन जणांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर या तिघांनी तिच्यावर इंधन टाकून तिला पेटविले. या आगीत ती गंभीररित्या जखमी झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ पीडितेच्या पतीने पोलिसांना दिला.

पीडितेचा जबाब

दरम्यान, पीडितेने न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर जबाब दिला असून पोलिसांनी मात्र अद्याप तिचा जबाब नोंदविलेला नाही. पोलिस अधिक तपास करत आहेत. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT