Gallantry awards 
देश

Gallantry awards: राष्ट्रपती मुर्मूंकडून 80 लष्करी कर्मचाऱ्यांना शौर्य पुरस्कार जाहीर; प्रजासत्ताक दिनी सन्मान

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शौर्य पुरस्कारांना मंजुरी दिली आहे. ८० लष्करी कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. यातील १२ जणांना तो मरणोत्तर मिळाला आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शौर्य पुरस्कारांना मंजुरी दिली आहे. ८० लष्करी कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. यातील १२ जणांना तो मरणोत्तर मिळाला आहे. ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त हे पुरस्कार दिली जातील. (President Droupadi Murmu has approved Gallantry awards to 80 Armed Forces personnel eve of the 75th Republic Day)

सहा जणांना किर्ती चक्रा देण्यात आले आहे, त्यातील तिघांना तो मरणोत्तर देण्यात आला. १६ शौर्य चक्रा पुरस्कार, त्यातील दोघांना मरणोत्तर पुरस्कार मिळाला. ५३ लष्करी कर्मचाऱ्यांना सेना मेडल्स देण्यात आलेत, त्यातील सात जणांना तो मरणोत्तर मिळाला आहे. नाव सेना मेडल आणि चार वायु सेना मेडल देण्यात आले आहेत.

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंधेला देशवासियांना संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी राम मंदिराचा उल्लेख केला, तसेच कर्पूरी काठुर यांना देखील श्रद्धांजली वाहिली. देशवासियांना त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ७५ वा प्रजासत्ताक दिवस हा ऐतिहासिक पल्ला आहे. हे एक युगप्रवर्तक कालखंड आहे. आज आपल्या मूलभूत सिद्धांतांना आठवण करण्याचा योग्य क्षण आहे, असं त्या म्हणाल्या.

आपल्या प्रजासत्ताकाच्या मूळ भावनेशी एकजूट होऊन १४० कोटी भारतीय एका कुटुंबाप्रमाणे राहत आहेत. जगातील सर्वात मोठे हे कुटुंब असून यात सह अस्तित्वाची भावना, सामूहिक उत्साह आहे, असंही त्या म्हणाल्या. आपण राम मंदिरात प्रभू रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा पाहिली आहे. भविष्यात या घटनेकडे एका व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं जाईल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : अपात्र लाडक्या बहिणींवर सरकारने आतापर्यंत किती रुपये खर्च केले? या पैशातून करता आली असती 'ही' मोठी कामे

LPG Alternative : LPG च्या टेन्शनपासून होणार सुटका ! आता एका क्लिकवर मिळणार PNG कनेक्शन, गॅसचा खर्चही होणार कमी, काय आहे सरकारची योजना?

Kolhapur Rape Case : ओळखपत्र करून देण्याचा बहाणा, तरुणीवर सामूहिक वारंवार अत्याचार; फोटो, व्हिडिओ व्हायरलची धमकी, पोलिसांनी मोबाईल घेतला अन्

Latest Marathi News Live Update : भोंदू अशोक खरातचा नाशिक पोलीस पुन्हा घेणार ताबा

Shirol Tehsildar protest : शिरोळ तहसीलदारांसह पाच अधिकाऱ्यांना कोंडले, पंचगंगा प्रदूषणप्रश्नी आंदोलक संतप्त

SCROLL FOR NEXT