narendra modi( 
देश

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : पंतप्रधान मोदींनी पंडित नेहरुंचा केला उल्लेख, म्हणाले...

सकाळन्यूजनेटवर्क

अहमदाबाद- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षाच्या उत्सवाला सुरुवात केली. मोदींनी साबरमतीमध्ये अमृत महोत्सवाचा शुभारंभ केला. यासह शुक्रवारी गुजरातमध्ये सहा ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पंतप्रधान मोदी साबरमती आश्रमपासून 386 किलोमीटर लांब दांडी मार्चला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. गुजरात सरकारकडून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षाला दर्शवण्यासाठी राज्यातील सहा जिल्ह्यातील 75 वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जातील. पंतप्रधान मोदी 11 च्या सुमारास साबरमती येथे पोहोचले. येथे फोटो गॅलरीमध्ये त्यांनी छगनलाल जाधव यांनी रेखाटलेल्या चित्राला पाहिलं. या रेखाचित्रामध्ये गांधी यांच्या दांडी यात्रेला दाखवण्यात आले आहे. 

पंतप्रधान मोदी यांनी जनतेला संबोधित करताना महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच पंडित जवाहरलाल नेहरु, सरदार पटेल आणि सुभाष चंद्र बोस या ऐतिहासिक महापुरुषांची आठवण काढली. भारत या महापुरुषांच्या स्वप्नातील भारत बनवण्यासाठी पुढे जात आहे, असं ते म्हणाले. पंतप्रधान मोदींनी देशाचे तरुण, विद्वान, कलाकार आणि साहित्यजगातील लोकांना स्वातंत्र्य आंदोलन, सैनिकांच्या गोष्टी आणि त्यावेळीचा इतिहास लिहिण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले. 
 


राजकोट, मांडवी (कच्छ), पोरबंदर, वडोदरा, बारडोली (सुरत) आणि दांडी (नवसारी) ही ठिकाणं भारताच्या स्वातंत्र्याशी जोडले गेले आहेत. उपमुख्यमंत्री  नितीन पटेल राजकोट समारोहाचे नेतृत्व करतील. गुजरात राज्य विधानसभेचे अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी वडोदराच्या नवलखी मैदानातील कार्यक्रमाचे नेतृत्व करतील. बारडोलीमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांनी शेतकऱ्यांना लादण्यात आलेल्या वाढीव कराविरोधात सत्याग्रह केला होता. त्यामुळे याठिकाणी इग्रजांना मोठा विरोध सहन करावा लागला. बारडोलीतील कार्यक्रमाची अध्यक्षता शिक्षा मंत्री भूपेंद्र सिंह चुडासमा यांच्याकडे आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran–US War Escalation : ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणने दुबईसह अनेक ठिकाणी हल्ले वाढवले, अनेक देशांत मंदीची शक्यता

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नोएल टाटा यांनी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटला दिली भेट

Success Story: कठीण परिश्रम आणि चिकाटीचा फळ; यूपीएससीत गोंदियाच्या श्रवण मुंदडा याला २७५ वा रॅंक

Anurag Dobhal: १५० किमी वेगात कारची धडक; लाईव्हमध्येच जीवन संपवण्याचा प्रयत्न? बिग बॉस स्टार अनुराग डोवालचा VIDEO समोर

Beed News: डोळेच काय, माझा मुलगाच घ्या; वडिलांनी घेतला अवयवदानाचा निर्णय, उपस्थितांना आले गहिवरून

SCROLL FOR NEXT