Priyanka Gandhi esakal
देश

Priyanka Gandhi : लोकसभा लढवणाऱ्या गांधी परिवारातल्या दहाव्या सदस्य; प्रियांका गांधींचा राजकीय प्रवास कसा आहे?

प्रियांका गांधी ह्या साधारण दीड दशक सक्रिय राजकारणातून दूर होत्या. त्या बहुतांश काळ उत्तर प्रदेशमध्ये पक्षाचं काम बघत होत्या. याचदरम्यान त्या रायबरेलीमध्ये आई सोनिया गांधी आणि अमेठीमध्ये भाऊ राहुल गांधींच्या प्रचारात सहभागी व्हायच्या.

संतोष कानडे

Congress Rahul Gandhi : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा निवडणुकीच्या राजकारणात पहिल्यांदाच उतरणार आहेत. राहुल गांधी वायनाडची जागा सोडणार आहेत, प्रियांका गांधी त्या जागेवर निवडणूक लढवतील. तर राहुल गांधी रायबरेलीतून खासदार असतील.

राहुल गांधी यांनी यावेळच्या लोकसभा निवडणुकीत रायबरेली आणि वायनाडमधून निवडणूक लढली होती. दोन्ही जागांवर त्यांनी चांगलं मताधिक्य घेऊन विजय मिळवला होता. मागच्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी दोन जागांवर निवडणूक लढवली होती. परंतु अमेठीमध्ये त्यांना स्मृती इराणींनी पराभूत केलं होतं. त्यामुळे २०१९मध्ये ते वायनाडमधून संसदेत पोहोचले होते.

२००४ पासून प्रचारसभांमध्ये सहभाग

प्रियांका गाधी ह्या पहिल्यांदाच निवडणुकीच्या आखात्यात उतरणार आहेत. यापूर्वी त्यांनी केवळ पक्षसंघटनेत काम केलेलं आहे. सध्या त्या काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्यही आहेत. २००४ मध्ये त्यांनी निवडणूक प्रचारसंभांमध्ये पहिल्यांदाच सहभाग घेतला होता. अनेक मतदारसंघांमध्ये त्यांनी सभा घेऊन जोरदार प्रचार केला होता.

२००७ मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये राहुल गांधींनी काँग्रेससाठी राज्यव्यापी प्रचार अभिनयान हाती घेतलं होतं. तेव्हा प्रियांका यांनी अमेठी-रायबरेली मतदारसंघातल्या दहा जागांवर लक्ष्य केंद्रित केलं होतं.

प्रियांका गांधी ह्या साधारण दीड दशक सक्रिय राजकारणातून दूर होत्या. त्या बहुतांश काळ उत्तर प्रदेशमध्ये पक्षाचं काम बघत होत्या. याचदरम्यान त्या रायबरेलीमध्ये आई सोनिया गांधी आणि अमेठीमध्ये भाऊ राहुल गांधींच्या प्रचारात सहभागी व्हायच्या.

सक्रिय राजकारणात सहभाग

२३ जानेवारी २०१९ मध्ये त्यांना अधिकृतरित्या उत्तर प्रदेशातल्या पूर्व भागात काँग्रेसचं प्रभारी सरचिटणीस म्हणून नियुक्त केलं होतं, तेव्हा त्या खऱ्या अर्थाने सक्रिय राजकारणात उतरल्या. त्यानंतर ११ सप्टेंबर २०२० रोजी त्यांना पूर्ण उत्तर प्रदेशात प्रभारी सरचिटणीत म्हणून नियुक्त केलं.

वैयक्तिक आयुष्य...

प्रियांका ह्या राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांची कन्या असल्याने लहानपणासून त्यांच्याभोवती एक वेगळं वलय होतं. प्रियांकांचा जन्म १२ जानेवारी १९७२ रोजी झाला. त्या राजीव गांधी फाऊंडेशन ट्रस्टच्या ट्रस्टी आहेत. त्यांनी १९९७ मध्ये उद्योजक रॉबर्ट वाड्रा यांच्याशी विवाह केला. दोघांना दोन मुलं-एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

प्रियांका यांनी १९८४पर्यंत आपलं शालेय शिक्षण देहराडूनच्या वेल्हम गर्ल्स स्कूलमध्ये घेतलं. त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव राहुल आणि प्रियांका दोघांनाही दिल्लीतल्या डे स्कूलमध्ये स्थलांतरित करण्यात आलं. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर सातत्याने येणाऱ्या धमक्यांमुळे दोघांचीही घरातच शिक्षणाची सोय करण्यात आली.

पुढे प्रियांका गांधी यांनी दिल्लीतल्या कॉन्व्हेंट ऑफ जीसस अँड मेरी स्कूलमध्ये शिक्षण घेतलं. त्यांनी मनोविज्ञान विषयात पदवी घेतली. २०१० मध्ये प्रियांका यांनी बुद्धिस्ट स्टडीजमध्ये मास्टर डिग्री घेतली. आता त्या लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या गांधी परिवारातल्या दहाव्या सदस्य असणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Award List: ऑरेंज-पर्पल कॅप आणि बक्कळ पैसा... पुरस्कार सोहळ्यातही वैभव सूर्यवंशीचाच डंका! पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

IPL 2026 Final: "जितेश राव, कसं वाटतंय?" हर्षा भोगलेंच्या प्रश्नावर RCB च्या Jitesh Sharma चं मराठीतून उत्तर; म्हणाला...

Virat Kohli Reaction : "आता मॅच जिंकवण्यासाठी मला एकट्यालाच मैदानात उतरावं लागत नाही!" विराट कोहली भावुक

Vaibhav Sooryavanshi : १५ वर्षाच्या पोराने मैदान गाजवले... Orange Cap सह ५ पुरस्कार जिंकल्यानंतर म्हणाला, या पर्वात शिकलो की...

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला ५ पुरस्कार अन् पैशांचा पाऊस! १५ वर्षांच्या पोराला कारसह BCCI कडून किती रुपयांचे बक्षीस मिळाले?

SCROLL FOR NEXT