देश

कुठे गेले 15 लाख आणि दोन कोटी रोजगार? राहुल गांधींचा घणाघात

सकाळ डिजिटल टीम

होशियारपूर : काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा रोजगार आणि काळ्या पैशाच्या मुद्यावरून पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला. मोदी हे याआधी त्यांच्या भाषणामध्ये प्रत्येकाच्या खात्यामध्ये १५ लाख रुपये जमा करण्याची घोषणा करत असत. दोन कोटी रोजगार देऊ असे सांगत असत. यापैकी एक तरी जनतेला मिळाले आहे का? आता ते भ्रष्टाचार आणि रोजगाराबाबत का बोलत नाहीत? मोदींनी (PM Modi) नोटाबंदी केली, वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू केला, याचा नेमका कोणाला फायदा झाला? असा सवाल काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज येथील प्रचारसभेत बोलताना केला. (Punjab Assembly Election 2022)

राहुल म्हणाले,

  • - शेतकऱ्यांनी थंडीमध्ये उपाशी राहून आंदोलन केले

  • - शेतकऱ्यांचे मेहनतीचे पैसे केंद्राकडून उद्योगपतींच्या घशात

  • - मोदींनी दोन मिनिटेही शेतकऱ्यांना आदरांजली वाहिली नाही

  • - आंदोलनादरम्यान मरण पावलेल्यांना केंद्राकडून भरपाई नाही

  • - राजस्थान, पंजाब सरकार आंदोलकांच्या पाठीशी उभे राहिले

पंजाबचे मुख्यमंत्री अडकले

पंतप्रधान मोदींचा (PM Modi) पंजाब दौरा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या दौऱ्यामुळे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांना आज होशियारपूरमध्ये आयोजित सभेत सहभागी होता आले नाही. मोदींच्या दौऱ्यामुळे पंजाबमध्ये नो फ्लाइंग झोन घोषित करण्यात आले असून त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला उड्डाणास परवानगी देण्यात आली नाही. चन्नी यांना हवाईमार्गे चंडीगडहून होशियारपूरला जायचे होते पण त्यांच्या हेलिकॉप्टरच्या उड्डाणास परवानगी मिळू शकली नाही. या मुद्यावरून काँग्रेसने भाजपवर टीका केला आहे. (Punjab Assembly Election 2022)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी राजकीय घडामोड! ठाकरे गटातील ६ बंडखोर खासदारांचे शिंदे सेनेत विलिनीकरण अधिकृत, लोकसभा सचिवालयाचा निर्णय

ENG vs IND: एकिकडे निवृत्तीची चर्चा, तर दुसरीकडे गंभीर-रोहितच्या लॉर्ड्सच्या बाल्कनीत गप्पा; Video तुफान व्हायरल

Latest Marathi News Live Update : भविष्यात पुणे आधुनिक शहर म्हणून ओळखलं जाईल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Kannad Crime : जेहूर येथे विवाहितेने विष प्राशन करून संपविले जीवन; पतीसह सासू-सासऱ्यांवर गुन्हा नोंद

Almatti Dam Water Level Latest Update : आलमट्टी धरणाचे पाणी केवळ पिण्यासाठीच; कृष्णा भाग्य जल निगमचा आदेश, शेतीवर परिणाम होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT