देश

पंजाब : चरणजीत यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

सकाळ डिजिटल टीम

कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यानंतर काँग्रेसने चरणजीत सिंह चन्नी यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ टाकली आहे.

पंजाबमध्ये अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर चरणजीत सिंग चन्नी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. चरणजीत हे पंजाबचे १६ वे मुख्यमंत्री ठरले आहेत. तर पहिल्यांदाच राज्याला दलित समुदायातील मुख्यमंत्री मिळाला आहे. पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका होणार असून त्याआधीच राज्यात मुख्यमंत्री बदलण्यात आला आहे. काँग्रेसमधील अंतर्गत कलहामुळे अमरिंदर सिंग यांनी राजीनामा शनिवारी राजीनामा दिला.

चरणजीस सिंग चन्नी यांच्यासोबत सोमवारी सुखजिंदर सिंह रंधावा यांनीही शपथ घेतली सुखजिंदर यांच्यासोबत ओपी सोनी यांनाही मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. दरम्यान, चन्नी यांचा शपथविधी ११ वाजता होणार होता मात्र तो साडेअकरा वाजेपर्यंत पुढे ढकलला होता. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी या शपथविधीला उपस्थित होते.

काँग्रेसनं दलित चेहरा मुख्यमंत्री म्हणून दिला आहे. याआधी भाजपने घोषणा केली होती की त्यांची सत्ता आल्यास राज्यात दलित व्यक्तीकडे नेतृत्व सोपवलं जाईल. बसपासोबत युती करणाऱ्या शिरोमणि अकाली दलानेसुद्धा अशीच भूमिका जाहीर केली होती. त्यामुळे व्होट बँकेचा विचार करूनच काँग्रेसनं चन्नी यांच्याकडे मुख्यमंत्रिपद सोपवल्याची चर्चा आहे.

चरणजीत सिंग हे दलित शिख समाजातील आहेत. अमरिंदर सिंग यांच्या सरकारमध्ये ते तंत्रशिक्षण मंत्री होते. रुपनगर जिल्ह्यातील चमकौर साहिब विधानसभा मतदारसंघातून ते आमदार आहेत. २००७ मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले होते. तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी आमदारकी जिंकली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सची विजयी मालिका खंडित! सनरायझर्स हैदराबादचा शानदार विजय; IPL 2026 Points Table बदललं

IPL 2026: आश्चर्यच... ना विराट, ना शुभमन Orange Cap तिसऱ्याच कुणाकडे; Purple Capवर चेन्नईच्या गोलंदाजाने निर्विवाद वर्चस्व

'काँग्रेस, काँग्रेस आणि फक्त काँग्रेस...;' मोदींचा केंद्रबिंदू त्याच नावाभोवती फिरला, संपूर्ण भाषणात किती वेळा उल्लेख केला?

SRH vs CSK Live: ४,४,४,४,४,६! आयुष म्हात्रेचं वादळ हेनरिच क्लासनने रोखलं; अविश्वसनीय झेल घेत हैदराबादचं मैदान गाजवलं Video Viral

होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! समुद्री व्यापारासाठी ‘सुरक्षाकवच देणार; जहाजांसाठी मोठी खुशखबर

SCROLL FOR NEXT