देश

सुखजिंदर रंधवांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ? अधिकृत घोषणा बाकी

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : नवज्योत सिद्धू यांचे जवळचे आमदार म्हणून ओळखले जाणारे सुखजिंदर रंधावा पंजाबचे नवे मुख्यमंत्री असण्याची दाट शक्यता आहे. काही वेळातच याबाबतची औपचारिक घोषणा करण्यात येऊ शकते. काँग्रेसचे आमदार प्रीतम सिंह कोटकपूरा आणि दर्शन सिंह बराड यांनी याबाबतच माहिती दिली आहे. तर दुसरीकडे सुखजिंदर रंधावा यांनी देखील म्हटलंय की, सरकार ४ महिन्यांचं असो वा ४ दिवसांचं, काम करणाऱ्यांसाठी हा पुरेसा वेळ आहे. ज्यांना काम करायचंच नाहीये त्यांच्यासाठी ४ वर्षे देखील कमीच आहेत.

पंजाबमधील कांग्रेसच्या आमदारांशी चर्चा केल्यानंतर ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने सुखजिंदर रंधावा यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी निश्चित केल्याचं सूत्रांकडून कळतंय. सध्या याबाबतची बैठक राहुल गांधींच्या घरी सुरु आहे. या बैठकीला अंबिका सोनी देखील उपस्थित आहेत.

मुख्यमंत्री पदाच्या शपथेबाबत त्यांनी म्हटलंय की, याबाबतचा अंतिम निर्णय हाय कमांडच करेल. तर काँग्रेस हायकमांड पंजाबमध्ये वन प्लस टू या फॉर्म्यूल्याचा वापर करण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांसोबतच दोन उपमुख्यमंत्री देखील बनवले जातील. यामध्ये एक दलित तर दुसरा हिंदू असेल, असंही म्हटलं जातंय. दलित कोट्यामधून अरुणा चौधरी आणि चरणजीत सिंह चन्नी आणि हिंदू चेहरा म्हणून विजय इंदर सिंगला आणि भारत भूषण आशू यांची नावे चर्चेत आहेत. चंदीगढमध्ये रंधावा यांच्या घराबाहेर आता कार्यकर्ते जमू लागल्यामुळे ही शक्यता अधिकच दाट होत चालली आहे.

याआधी कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या राजीनाम्यानंतर रविवारी चंदीगढमध्ये होणाऱ्या काँग्रेस आमदारांची बैठक स्थगित करण्यात आली होती. अनेक दिग्गज काँग्रेसी नेत्यांच्या नावांबद्दल चर्चा केली जात होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT